नांदेड : केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा संपन्न

प्रल्हाद कांबळे
Friday, 20 November 2020

या शेतीशाळेत पिकांत समतोल अन्नद्रव्याचे महत्त्व याविषयाचे व शासनाच्या “विकेल ते पिकेल” या योजनेतर्गंत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन केळी पिकांवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरु करण्याची संधी व मिळणारे अनुदान या विषयांचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी मागदर्शन केले.

नांदेड :- कृषि विभागाअंतर्गत हॉर्टसॅप सन 2020-21 अंतर्गत अर्धापूर तालुक्यातील चेनापुर येथे केळी पिकावरील किड व रोग नियंत्रणाबाबत शेतीशाळा नुकतीच संपन्न झाली. या शेतीशाळेचे आयोजन अर्धापुरचे कृषि पर्यवेक्षक प्रवर्तक जी. पी. वाघोळे यांनी केले होते.

या शेतीशाळेत पिकांत समतोल अन्नद्रव्याचे महत्त्व याविषयाचे व शासनाच्या “विकेल ते पिकेल” या योजनेतर्गंत शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करुन केळी पिकांवर आधारीत प्रक्रिया उद्योग सुरु करण्याची संधी व मिळणारे अनुदान या विषयांचे उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी मागदर्शन केले.

हेही वाचा नांदेड विभागात चार लाख टन उसाचे गाळप, दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन

या शेतीशाळेस उपस्थित वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील शास्त्रज्ञ श्री. दोंडे यांनी केळी पिकांवर येणारा सीएमव्ही व करपारोग नियंत्रण या विषयांची माहिती दिली. तसेच केळी संशोधन केंद्र नांदेडच्या सौ. धुतराज मॅडम यांनी केली. पिकांचे पोषण करतांना अन्नद्रव्याचे महत्त्व विषद करुन प्रास्तावीक शेतीशाळा प्रशिक्षक जी. पी. वाघोळे यांनी केले . प्रत्येक महिन्याला एक वर्ग व पिकवाढीच्या अवस्थेतनुसार केळी पिकांस त्या त्या टप्यावर मार्गदर्शन करण्याकरीता या शेतीशाळेचे वर्ग नियोजन होणार सोबत सांघिक खेळांच्या माध्यामातुन शेतकऱ्यामध्ये उत्साह निर्मिती करुन केळी पिकांच्या कृषि परीसंस्थेचा अभ्यास कसा करावा. यांचा पिकवाढीवर काय परीणाम होतो याचे चित्रीकरण व सादरीकरण इ. करण्यात करुन या बद्दल तालुका कृषि अधिकारी शिरफुले यांनी माहिती दिली. तालुक्यातर्गंत कृषि विभागाच्या योजनांची मंडळ कृषि अधिकारी श्री. चातरमल यांनी माहिती दिली. या शेतीशाळेस उपस्थितीत शेतकरी सर्व शास्त्रज्ञ व अधिकारी यांचे आभार मानले. हा शेतीवर्ग यशस्वी करण्याकरीता कृषिमित्र गोंविद जंगीलवाड व चिमनाजी डवरे यांनी विशेष सहकार्य केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Pest and Disease Control on Banana Crops nanded news