नांदेड : दत्तगडाच्या विकासासाठी आराखडा गरजेचा आहे, पालकमंत्री अशोक चव्हाण 

बाबूराव पाटील
Wednesday, 2 December 2020

येथील सेवा समर्पण प्रतीष्ठाणच्या वतीने गडावर विविध कामे व सूशोभीकरण करण्यात आले आहे.त्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.

भोकर (जिल्हा नांदेड) - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक दतगडावर विविध सूशोभीकरणासह विकासाभिमुख कामे करून ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी सर्व घटकांतील लोकांनी एकत्र येऊन आराखडा तयार करणे गरजेच आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. एक) केले आहे.

येथील सेवा समर्पण प्रतीष्ठाणच्या वतीने गडावर विविध कामे व सूशोभीकरण करण्यात आले आहे. त्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर  ऊत्तम बन महाराज, महंत प्रभाकर कपाटे बाबा, माजी आमदार वसंत चव्हाण, आमदार अमर राजूरकर, मंगाराणी अंबूलगेकर, जगदीश पाटील भोसीकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, विनोद पाटील चिंचाळकर, नागनाथ घिसेवाड, राजू पाटील दिवशीकर, सूभाष पाटील कीन्हाळकर, गोवींद बाबा गौड पाटील, राजूरेड्डी लोकावाड यांची उपस्थिती होती.

हेही वाचा -  नांदेड : ऑनलाईन अर्ज करुनही पिक विमा जमा न झाल्यास कृषि कार्यालयास करावा संपर्क -

श्री.चव्हाण म्हणाले की.यावर्षी पाऊस समाधानकारक झाल्यानें पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.ऊन्हाळ्यात होणा-या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. शहराला लाभलेल्या ऐतिहासिक दत्तगड अतिक्रमणाच्या विळख्यात सापडतो आहे. गडावर विकासात्मक कामे करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र  येऊन समिती गठीत करावी आणि विकास आराखडा तयार करावा त्यामुळे कामे करणे सोयीचे ठरणार आहे.मी स्वताह जातीने लक्ष देऊन लागणारा निधी मिळुन देण्याचा प्रयत्न करीन.सेवा समर्पण प्रतिष्ठानचे काम  कौतुकास्पद आहे. विकास होत असेल तर मी हि तूमचा सदस्य होण्यासाठी तयार आहे समितीत मला सामावून घ्यावें असे सांगितले आहे. राजूरेड्डी लोकावाड यांनी प्रास्ताविक केले. नारायण कुमरे यांनी सूत्रसंचालन तर विठ्ठल फुलारी यांनी आभार मानले आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A plan is needed for the development of Dattagad, Guardian Minister Ashok Chavan nanded news