नांदेड : चिकाळा तांडा येथे गावठी दारूच्या हातभट्टयांवर पोलिसांची कारवाई

गंगाधर डांगे
Thursday, 10 September 2020

चिकाळा तांडा तालुका मुदखेड येथे मागील अनेक दिवसापासून हातभट्टी दारू निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याने तालुक्यामधील अनेक गावांमध्ये गावठी दारूची विक्रीचे प्रमाण वाढले असल्याने अनेक कुटुंबाचा संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. चिकाळा तांडा परिसरात अनेक ठिकाणी हातभट्ट्या चालू

मुदखेड (जिल्चिहा नांदेड) - काळा तांडा तालुका मुदखेड येथे पोलीस उपविभागीय अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुनिल निकाळजे व सुरेश भाले यांनी मुदखेड पोलिसांचे पथक तयार करून गावठी दारू तयार करण्च्या हातभटयांवर कारवाई केली या कारवाईमध्ये दीड हजार लिटर रसायन व दारू पकडून नष्ट केले आहे.

चिकाळा तांडा तालुका मुदखेड येथे मागील अनेक दिवसापासून हातभट्टी दारू निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असल्याने तालुक्यामधील अनेक गावांमध्ये गावठी दारूची विक्रीचे प्रमाण वाढले असल्याने अनेक कुटुंबाचा संसार उध्वस्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. चिकाळा तांडा परिसरात अनेक ठिकाणी हातभट्ट्या चालू असल्याचे मुदखेड चे पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांना माहीत मिळाल्यामुळे यांनी काल ता. ८ रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस तुकडी च्या साह्याने सकाळी ९ वाजता अचानक धाडसत्र सुरू केले याड सत्रांमध्ये चिकाळा तांडा येथे अनेक ठिकाणी गावठी दारू निर्मितीच्या हातभट्ट्या आढळून आल्या या धाडस सत्रात पथकाला दीड हजार लिटर दारू व रसायन मिळून आले दरम्यान हे सर्व दारू व रसायन पोलिसांनी नष्ट केले. या धाड सत्रात नष्ट केलेली रसायन दारू व व निर्मिती चे साहित्य असा एकूण साठ हजार रुपये किमतीचे होते असे मुदखेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सूनील निकाळजे यांनी सांगितली.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, स.पो.उपनि.उतम बुकतरे, रमेश खाडे, पोलिस जमादार केशव पांचाळ, मधुकर पवार, तेलंग ,पवार, कदम आलेवाड, पठाण चालक पठाण, महीला कर्मचारी विदया दवे, पमिता शिरसे, त्रिशला सुर्यवंशी, आशा गोडबोले यांच्यासह मुख्यालयातील राखीव पोलीस पथकामधील चाळीस पोलीस कर्मचारी व व तीन पोलीस अधिकारी या कारवाई समाविष्ट होते.

या कारवाई दरम्यान मुदखेड पोलिसांनी गावठी हातभट्टी तयार करणारे वामन शंकर पवार, भाऊसाहेब सावरा चव्हाण, बालाजी रामभाऊ चव्हाण, संतोष उत्तम राठोड या चार जणांना ताब्यात घेऊन  त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Police action on village liquor kilns at Chikala Tanda nanded news