Nanded Police : नांदेड पोलिस परिक्षेत्र आता ‘ईगल’च्या नजरेत; गुन्हे तपासासाठी अत्याधुनिक प्रणाली, वेबसाइट, ई-टपाल सेवा कार्यान्वित
Nanded News : नांदेड पोलिस परिक्षेत्राने अत्याधुनिक ‘ईगल’ क्राईम तपास प्रणाली आणि ई-टपाल सेवा कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे गुन्हे तपासात अचूकता आणि कार्यालयीन व्यवहारात गती येणार आहे.
नांदेड : नांदेड परिक्षेत्रीय पोलिस कार्यालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू मनोहर चासकर यांच्या हस्ते पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयात पार पडले.