

Nanded
esakal
गौरव सुधा आनंद वाळिंबे
नांदेड: नागरिकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिस चौक्या चक्क मद्यपींनी आपला अड्डा बनविल्याचे भीषण वास्तव ‘सकाळ’ने रविवारी (ता.१९) केलेल्या पाहणीत समोर आहे. सकाळचे अकरा वाजले होते. शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळनगर पोलिस चौकीत एखादा पोलिस कर्मचारी दिसेल, नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या जात असतील, परिसरात कायदा-सुव्यवस्थेवर लक्ष ठेवले जात असेल, अशी अपेक्षा असता येथे वेगळेच धक्कादायक चित्र पाहायाला मिळाले. पोलिस चौकीचे सताड दरवाजे...पण आत पोलिस नाहीत.