नांदेड : वाटमारी करणाऱ्या दरोडेखोरांना पोलिस कोठडी- पावणेपाच लाख जप्त, कुंटुर पोलीसांची कारवाई

file photo
file photo

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : अंडे विक्री केलेली रक्कम घेवून तेलंगणाकडे निघालेला टेंपो अडवून चार लाख ९४ हजाराची रोख रक्कम लुटल्याची घटना ता. १७ डिसेंबर रोजी पहाटे घडली होती. सदर प्रकरणी ता. २१ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची सुत्रे हलवून २४ तासात कुंटुर पोलिसांनी दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून आरोपीकडून चार लाख ७४ हजार व गुन्ह्यात वापरलेली तलवारही जप्त करण्यात आली असून त्यांना पोलिस कोठडीत पाठविले आहे. अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक करीम पठाण यांनी दिली आहे. 

शेख असीफ अली मुनवर अली यांची अली ऍग्रो फार्मीग सिद्धिपेठ (तेलंगणा) येथे असून त्यांचा अंड्याचा व्यवसाय आहे. शेतक-यांकडून अंडी खरेदी करतात आणि वाशिम, अकोला आणि नांदेड या ठिकाणी व्यापाऱ्यांना पुरवतात. ता. १५ डिसेंबर रोजी त्यांनी (टी. एस.१६ यु.सी. २३४३) या क्रमाकांच्या वाहनातून वाशिम येथील व्यापाऱ्याला अंड्याची डिलेवरी करुन त्याची चार लाख ९५ रुपयाची रोख रक्कम घेवून ते हिंगोलीमार्गे ता. १६ रोजी नांदेडला पोहचले. नांदेडवरुन तेलगंणाकडे जात असतांना नायगाव तालुक्यातील देगाव फाट्याजवळ दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी वाहन आडवले.  तिघांपैकी एकजन तलवार घेवून गाडीत चढला व तलवारीचा धाक दाखवून शिटच्या मागे ठेवलेली चार लाख ९५ रुपयाची रोख रक्कम काढून घेतली. तर दुसऱ्यांने चावी हिसकावून दुर फेकून दिली. तिसरा मोटारसायकलवरच बसून होता. रक्कम लुटल्यानंतर तिनही दरोडेखोरांनी मोटारसायकलवरुन धुम ठोकली होती. 

टेंपो चालक मिर्झा अफजल बेग यांनी ता. १७ रोजी पहाटे ४.१० वाजता सदरची घटना मालकाला सांगितली. त्यानंतर मालकाने या घटनेत चालक किंवा सोबतचे कर्मचारी किंवा संबंधीत व्यक्तींचा सहभाग तर नाही ना याची अगोदर खात्री केली केली त्यानंतर ता. २१ रोजी शेख असीफ अली मुनवर अली यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. 

घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवली. त्यावेळी आरोपी गुप्त ठिकाणी असल्याची माहिती यावरुन करीम पठाण पथकासह तेथे पोहचले व शेख जैनौद्दिन दस्तगीर इतवारा नांदेड, शेख जाफर शेख जमील परभणी, अकबर वलीयोद्दीन मिनार मस्जिद परभणी  या तिघांना अटक केली. अटक केल्यानंतर तिघांना पोलिसी खाक्या दाखवताच रक्कम लुटल्याची कबुली दिली आणि  लुटलेली रक्कम एक लाख ६५ हजार, एक लाख ५७ हजार आणि एक लाख ५२ हजार अशी तिघांनी वाटून घेतल्याचेही सांगितले. लुटलेल्या रक्कमेपैकी चार लाख ७४ हजार रुपये व सदरच्या गुन्ह्यात वापरलेली तलवार जप्त करण्यात आली आहे. केवळ २० हजार रुपये जप्त करणे बाकी आहे. एवढ्या गंभीर व किचकट प्रकरणाचा कुंटूर पोलिसांनी २४ तासात छडा लावल्याने कौतुक होत आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना ता. २२ रोजी नायगाव येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी दिवणी नायाधिशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सदरच्या गुन्हे शोध कामात अब्दुल बारी, एस.एन.बुद्देवाड, ईश्वरे, अभिजित पाटील यांनी परिश्रम घेतले.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com