Nanded Police: बनावट कॉस्मेटिक, तेही मेड इन पाकिस्तान; नांदेडमध्ये इतवारा पोलिसांकडून साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
Nanded Police Raid: नांदेड पोलिसांनी मन्यार गल्लीतील परवान्याशिवाय विक्रीस ठेवलेल्या बनावट ‘मेड इन पाकिस्तान’ कॉस्मेटिक साहित्य जप्त केले. सिडकोतील पत्रकार भवन जागेवर अतिक्रमणही उघडकीस आले.
नांदेड : इतवारा पोलिसांनी गुरुवारी (ता.२५) मन्यार गल्ली परिसरात परवान्याविना विक्री होणारे ‘मेड इन पाकिस्तान’ असलेले बनावट कॉस्मेटिक साहित्य जप्त केले. दोन संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.