Nanded : समाजातील गरिबांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपक्रमाची सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : समाजातील गरिबांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी उपक्रमाची सुरुवात

नांदेड : सफा बैतूल माल व रहेबर फाउंडेशन हैदराबाद यांच्या वतीने समाजातील ५० गरीब बेरोजगार लोकांना रोजगार सुरू करण्यासाठी शनिवारी मदत करण्यात आली.

यामध्ये व्यवसाय करण्यासाठी लागणारा गाडा तसेच फळे, भाजी व दैनंदिन उपयोगात लागणारे सामान व्यवसाय करण्यासाठी संस्थेच्या वतीने मोफत भरून देण्यात आले. ज्यामुळे हे गरीब लोक व्यवसाय करून आपले पोट स्वाभिमानाने भरू शकतील अशी व्यवस्था या कृतीशील उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. समाजातील गोरगरीब कुटुंबांना व्यवसायासाठी मदत केल्यामुळे या गरीब कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे. समाजात अशाच दानशूर संस्था निर्माण झाल्या तर समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांसह गरीब बेरोजगारांनी व्यक्त केल्या.

यावेळी हैदराबाद येथील हाफेज मुबशीर खान, मौलाना सरवर खासमी, मौलाना सिद्दीक साहब नदवी, हाफेज असलम खान, अकसा ग्रुप फाउंडेशनचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी हाफेज तयाब साहेब यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.