Nanded : शिक्षकांची रिक्त पदे भरून त्यांना शिकवू द्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded primary school teachers

Nanded : शिक्षकांची रिक्त पदे भरून त्यांना शिकवू द्यावे

नांदेड : राज्यात प्राथमिक शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी व गटशिक्षणाधिकारी ही शिक्षण विभागातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत त्याचा शैक्षणिक कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यासाठी ही पदे तत्काळ भरावीत तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे व पदोन्नती प्रक्रिया पार पाडावी, या विषयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्यभरातून मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविण्यात आले.

नांदेडला जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची भेट घेऊन पुरोगामी शिक्षक संघटनेने निवेदन दिले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षकांची १७ हजार ५४३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण? बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा २००९ अन्वये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मंजूर असलेली सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत. तसेच आजकाल शिक्षकांना शैक्षणिक सोडून अन्य अशैक्षणिक कामे मोठ्या प्रमाणावर दिली जात आहेत. त्यामुळे त्यांचे शिकवण्याचे मुख्य काम मागे पडत आहे.

राज्यातील प्राथमिक शाळेत शिपाई व लिपिक नसल्यामुळे शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे करावी लागत आहेत. अशैक्षणिक कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करुन शिक्षकांना बीएलओसह सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करावे. विद्यार्थी हितासाठी वरील मागण्यांबाबत सकारात्मक विचार करुन लवकरात लवकर त्या सोडवाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर, विजय भोगेकर, महिला राज्याध्यक्ष अल्काताई ठाकरे, राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, राज्य संघटक अशोक मोरे, औरंगाबाद विभागिय अध्यक्ष सतीश रेड्डी, लातुर विभागीय अध्यक्ष शिवशंकर सोमवंशी, विभागीय उपाध्यक्ष श्रीराम कलणे, जिल्हाध्यक्ष जे. डी. कदम, जिल्हा सरचिटणीस नागनाथ गाभणे, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक कल्याणकस्तुरे, जिल्हा कोषाध्यक्ष बळीराम फाजगे, जिल्हा मुख्य संघटक गोविंद मोरे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कोंडावार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Nanded Primary School Teachers Post Vacancies Student Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..