नांदेड : दाळीचे दर गगणाला, भाजीपाल्याचे दर कडाडले, अनेक भाज्या गायब

प्रल्हाद कांबळे
Friday, 2 October 2020

कुठल्याही भाजीचा भाव विचारला तर ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. अनेक हिरव्या भाज्या बाजारातून गायब झाल्या आहेत. हिरवी मिरची ५० ते ६० रुपये, कांदा ६० रुपये, लसुन १५० रुपये या दराने विकल्या जात आहे. या महागाईचा फटका सर्वसाधारण ग्राहकांना बसला असून गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. 

नांदेड : जिल्ह्यात मागील तीन महिण्यापासून सतत पावसाने दडी धरल्याने शेतातील मुग, उडीद हे कडधान्य हातचे गेले. तसेच रानभाज्यासुद्धा पावसाने पाहिजे अशा आल्या नाही. याचा फटका भाजीपाल्याला बसला. बाजारात दाळी महागल्याने भाजीपाला तेजीत आला आहे. कुठल्याही भाजीचा भाव विचारला तर ग्राहकांचे डोळे पांढरे होत आहेत. अनेक हिरव्या भाज्या बाजारातून गायब झाल्या आहेत. हिरवी मिरची ५० ते ६० रुपये, कांदा ६० रुपये, लसुन १५० रुपये या दराने विकल्या जात आहे. या महागाईचा फटका सर्वसाधारण ग्राहकांना बसला असून गृहीणींचे बजेट कोलमडले आहे. 

मागील तीन महिन्यात पावसाची सतत रिपरिप सुरू होती. परिणामी शेतात पाणी थांबल्याने भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. दरम्यान बाजारातून मेथी, चुका, पालक गायब झाला असून इतर भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. सर्वसामान्यांना आता भाजीपाल्याऐवजी डाळी, अंडी, चिकन यावर भर द्यावा लागत आहे. मात्र दाळीही कडाडल्याने आता खवय्यांची चांगलीच पंचायत आली आहे. जेवणात नेहमी लागणारी हिरवी मिरची ५० ते ६० रुपये किलो, कांदा ६० रुपये किलो आणि लसुन १५० रुपये किलो. सोबतच कोथिंबीर दहा रुपयाला ५० ग्रॅम दराने मिळत आहे. त्यामुळे घराघरात फोडणी महागली आहे. 

हेही वाचाशेतकऱ्यांवर तिहेरी संकट : राज्यातील २१ जिल्ह्यात लंपी स्किन आजाराची व्याप्ती

शेवगा चांगला भडकला

बाजारात आलेल्या ग्राहकांच्या तोंडाला पाणी सोडणारी सिमला मिरची, तुरई (दोडके), गवार, फुलकोबी, पानकोबी, भेंडी, कदु, भोपळा, शेपु या भाजीपाल्यांचा दर गगणाला भिडला आहे. हा भाजीपाला ६० ते ८० रुपये किलो दराप्रमाणे मिळत आहे. शेवग्याच्या शेंगा सध्या बाजारात उपलब्ध नाहीत. परंतु आहे त्या ठिकाणी त्यांचे दर १२० ते १५० रुपये किलो आहे. शेवगा शेंग सध्या बायलर चिकनपेक्षाही महागली आहे. या सोबतच आलू मात्र सध्या चाळीस रुपये किलोवर थांबला आहे.

पावसाने मेथी, पालक गेल्याने बाजारातून गायब

पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास भविष्यात भाजीपाल्याचे दर पुन्हा वाढतील असे भाजी विक्रेत्यांनी सांगितले. हिरवा भाजीपाला गायब होत असल्याने दाळीचाही भाव कडाडला आहे. मेथी, पालक हा भाजीपाला शेतातच अती पावसामुळे सडून गेला आहे. त्यामुळे बाजारात मेथी, पालक विक्रीसाठी येत नाही. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतातील भाजीपाला खराब झाला आहे. भाजीपाला कमी प्रमाणात मिळत असल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. 

येथे क्लिक कराविद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज : वनविभागाकडून वन्यजीव छायाचित्र स्पर्धा

अंड्याचा भाव वाढला

नेहमी ५० रुपये डझन मिळणारे अंडे आता ८४ रुपयाने मिळत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे दर वधारले असून सर्वसामान्य ग्राहकांना भाजीपाला महागला की अंड्याचा आधार वाटत होता. परंतु त्याचाही भाव वाढल्याने ग्राहक हवालदिल झाला आहे. सततच्या पावसाने सर्व बाजारावर परिणाम केला आहे. शेतकऱ्यांच्या पूर्वहंगामी पिकांसोबत भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजीपाला पीक विम्याचा अधिपत्याखाली आणावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Pulses prices, vegetable prices high, many vegetables disappear nanded news