esakal | मालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद होती. दरम्यानच्या काळात मालवाहतुक सुरु होती. त्यामध्ये नांदेड रेल्वे विभागाने ५.२५ कोटीचा महसुल मिळवला आहे.

मालवाहतुकीमध्ये नांदेड रेल्वे विभाग अग्रेसर, सव्वापाच कोटीचा महसुल मिळवला

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः कोरोना काळामध्ये सर्वप्रकारची वाहतुक सेवा बंद होती. त्यामध्ये रेल्वेचाही समावेश होता. मात्र, अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वेची मालवाहतूक सुरु होती. अनलॉकमध्ये नांदेड विभागाच्या वतीने  एक हजार ६५ विशेष गाड्या चालविल्या असून, मालवाहतूकीतून ५.२५ कोटी रुपयांचा महसुल मिळविल्याची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात मंगळवारी (ता.२६) दिली.

उपिंदर सिंघ पुढे म्हणाले की, या वर्षभरात नांदेड रेल्वे विभागातून श्रामिकांकारिता २८ श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या. तसेच गेल्या वर्षभरात नांदेड रेल्वे विभागाने उन्हाळी सुट्ट्या आणि इतर सणानिमित्त एक हजार ६५ विशेष गाड्या चालविल्या आहेत. या वर्षभरात गाड्यांच्या वेळापत्रकात सुधार करून 95.11 टक्के गाड्या वेळेनुसार चालविण्यात आल्या. इंजिनियारिंग विभागातील कर्मचाऱ्यांनी रेल्वे पटरीच्या देखरीखी करिता विशेष मेहनत घेतल्यामुळे मालगाड्यांच्या गतीमध्ये खूप सुधारणा होवून जी गती गेल्या वर्षी २८ किलोमीटर प्रती घंटा होती ती वाढून ४५ किलोमीटर प्रती घंटा झाल्याचेही उपिंदर सिंघ यांनी सांगितले.

हेही वाचामुलींवर कुठलेही बंधन न लादता तिला हवे ते क्षेत्र निवडू द्यावे - न्यायाधीश श्रीराम जगताप

शेतीमालासाठी किसान रेल्वे

शेतीमालाच्या लवकर आणि किफायतशीर वाहतुकी करिता नांदेड रेल्वे विभागातून  दिनांक पाच जानेवारी २०२१ पासून  किसान विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत. नांदेड रेल्वे विभागातून आत्ता पर्यंत २५ किसान विशेष रेल्वे गाड्या चालविल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने कांदा पाठविण्यात येत आहे. या किसान रेल्वे न्यू गुवाहाटी, न्यू जालपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला आदी  ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. यावर्षी मार्च महिन्याअखेरीस आणखी ७५ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ठ आहे. किसान रेल्वे चे वैशिठ्य म्हणजे या गाड्या निश्चित वेळापत्रकानुसार ५० किलोमिटर प्रती घंटा याप्रमाणे धावतात.  तसेच या किसान रेल्वेच्या मालभाड्या मध्ये ५० टक्के सूट मिळत आहे. आत्तापर्यंत चालविण्यात आलेल्या २५ किसान रेल्वे मधून नांदेड रेल्वे विभागास ५.२५ कोटीचा महसुल मिळाला आहे.  

मालवाहतुकीसाठी उत्कृष्ट नियोजन

यावर्षी माल वाहतुकीमध्ये नांदेड विभागाने उत्कृष्ठ नियोजन केले होते. वसमत, औरंगाबाद आणि परभणी रेल्वे स्थानकावरून विविध ठिकाणी १२ साखरेचे रेक पाठविले. तसेच आदिलाबाद येथून पाच मक्याचे रेक पाठविले.  हिंगीली रेल्वे स्थानकावरून तीन वर्षाच्या अंतरानंतर सरकीचे तीन रेक पाठविण्यात आले आहेत. याशिवाय मालटेकडी-नांदेड येथून गुळाचे पाच रेक पाठविण्यात आले.

येथे क्लिक करा- मुदखेड येथील सीआरपीएफ केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात ७२ वा प्रजासत्ताक दिन

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी

नांदेड रेल्वे विभागाने नांदेड, पूर्णा आणि जालना येथे कोविड-१९ विलगीकरण कक्ष बनवले आहेत. ज्यात वाय-फाय इंटरनेट सुविधांसह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावर्षी जालना रेल्वे स्थानकावर ४० सी.सी. टी. व्ही. केमेरे लावण्यात आले आहे. तसेच नांदेड रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये दररोज सेनिटायीझ करण्यात येत आहे. यावर्षी अकोला ते अकोट दरम्यान ४४.८ किलोमीटरचा नवीन ट्रेक बनविण्यात आला. तसेच अकोला स्टेशन यार्ड री-मोडेलिंग करून distributed electronic interlocking system सोबत जोडण्यात आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 

loading image