Nanded rain : पावसाळ्यातील ५० टक्के पाऊस अवघ्या सहा दिवसांत! अतिवृष्टीमुळे खरीप पिकांची दाणादाण

जिल्ह्यात आतापर्यंत पन्नास टक्के पाऊस; मुसळधार पावसाने खरिपाचे नुकसान
nanted
nanted sakal

नांदेड : मागील सहा दिवसात शहर आणि जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे यंदाच्या वर्षी आजपर्यंत पन्नास टक्के पाऊस झाला आहे. ता. १७ जुले रोजी ६५ टक्क्यांनुसार १८३.७० मिलीमीटर पाऊस झाला होता. यानंतर झालेल्या तुफान पावसामुळे ता. २२ जुलेपर्यंत ११५ टक्क्यानुसार सरासरी ३७९ मिलीमीटरवर पोहचली.

बुधवारी (ता. २६ जुलै) सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण सरासरी ४३७ मिलीमीटर म्हणजेच १२१ टक्क्यानुसार ४९.०९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे खरिपातील पिकांसह शेतीची दाणादाण उडाली आहे.

जिल्ह्यात जून ते ता. ३१ ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत वार्षिक सरासरी ८९१.३० मिलीमीटर पाऊस पडतो. हा जून महिन्यात सुरु होतो. परंतु यंदा जूनमध्ये अपेक्षीत पाऊस झाला नसल्याने खरिपातील पेरण्या सुरु झाल्या नव्हत्या. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली.

यानंतर केवळ पिकं जोपासण्यासारखा पाऊस होता. जिल्ह्यात ता. १७ जुलै पर्यंत आज रोजी पडणाऱ्या पावसाच्या केवळ १८३.७० मिलीमीटर पाऊस झाला होता. यानंतर मात्र, जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. हा पाऊस किनवट, माहूर, हदगाव, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्माबाद या तालुक्यात सर्वाधीक झाला. या तुफान पावसामुळे ता. २२ जुले पर्यंत ११५ टक्क्यानुसार सरासरी ३७९ मिलीमीटरवर पोचली.

nanted
Nagpur : नागपूरकरांनो लक्ष द्या; डोळे सांभाळा, शहरात पसरली साथ, डॉक्टर म्हणाले...

केवळ सात दिवसात आजपर्यंत पडणार्‍या पावसाच्या ५० टक्के पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यात खरिपातील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मुग पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या सोबत अनेक भागातील नद्यांना पूर आल्यामुळे नदीकाढची जमीन खरडून पिके वाहून गेली आहेत. तर सखल भागातील जमिनीतही पाणी साचून पिके करपली आहेत.

कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्याने शेतीची दाणादाण उडाली आहे. सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी ता. २६ जुलैपर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात कंधार, लोहा, नांदेड व हिमायतनगर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे.nagpur

nanted
Nagpur : कारच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

जिल्ह्यात एकूण ४३७.५० मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात गेल्या २४ तासात बुधवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी बारा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात यंदाच्या वर्षी ता. एक जूनपासून आत्तापर्यंत एकुण ४३७.५० मिलीमीटर पाऊस झाला आहे. त्याची सरासरी ४९.०९ टक्के आहे. गेल्या २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या वर्षी ता. एक जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची आहे.

नांदेड - १७.९० (३३२.६०), बिलोली - ८.७० (५३५.९०), मुखेड - २४ (४६५.४०), कंधार - १६ (२२३.८०), लोहा - २६.५० (३१७.१०), हदगाव - ५.१० (४०६.४०), भोकर - १२.१० (४७६.९०), देगलूर - १०.९० (४६३.१०), किनवट - ०.२० (६१५.४०), मुदखेड - ९.४० (४१०.६०), हिमायतनगर - २.८० (३८०.२०), माहूर - ०.७० (६८४.१०), धर्माबाद - १५ (४९८), उमरी - ११.८० (४७५.३०), अर्धापूर - ६.२० (४१७), नायगाव - १३.१० (३५३) मिलीमीटर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com