
नांदेड : जिल्ह्यात तब्बल १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बुधवारी (ता. सहा) सकाळपासून पावसाने हजेरी लावली. या संततधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, बळिराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे. सुकू लागलेल्या पिकांमध्ये नवजीवन संचारले असून, उभ्या पिकांना बळकटी मिळण्याची शक्यता आहे.