esakal | नांदेड : कोरोनाबाधीत मृतदेहाचे नातेवाईकांना तिसऱ्या डोळ्याद्वारे होणार अंत्यदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

तिसरा डोळा

नांदेड : कोरोनाबाधीत मृतदेहाचे नातेवाईकांना तिसऱ्या डोळ्याद्वारे होणार अंत्यदर्शन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूंची संख्या वाढत (Corona virus death people) असल्याने अनेक नातवाईकांना आपल्या लाडक्या व्यक्तीचे दर्शन मिळत नव्हते. त्यासाठी येथील शांतीधाम प्रतिष्ठान (Shantidham pratishthan nanded) पुढे आले. त्यांनी स्वखर्चाने गोवर्धनघाट स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यामुळे आता अंत्यविधीचा लाभ दूरवर असलेल्या नातेवाईकाला व मित्रपरिवाराला घेता येईल. (Nanded: Relatives of Corona-affected bodies will be cremated through the third eye)

याशिवाय नदी परिसरात आपण घाण कचरा करत असाल तर आता या कॅमेऱ्याद्वारे ठिपले जाणार आहे. त्यामुळे अंत्यविधी व इतर धार्मिक कार्य करताना नदीचं पावित्र्य राखलं जाईल याची काळजी घ्यावी. कचरा टाकण्यासाठी उपलब्ध केलेल्या कुंड्याचा वापर तेथए येणाऱ्यांनी करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

हेही वाचा - वसमतमध्ये 137 बेडचे डेडिकेटेड शासकीय रुग्णालय सुरु- राजू नवघरे

हा नाविन्यपुर्ण प्रकल्प सर्व दानशूर दात्यांच्या संकल्पना व देणगीतून शक्य झाला आहे. निस्वार्थ सेवा देणारी शांतीधाम सेवाप्रतीष्ठान संस्था आपल्या शहरात असल्याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे. यासाठी एम. आर. जाधव व हर्षद शहा आणि त्यांच्या सर्व टीमने हे काम मार्गी लावले.