Nanded : प्रजासत्ताक दिनी दिल्ली कर्तव्यपथावर संचलनात गौरवलेले चित्ररथ आज माहूरात Nanded Republic Day Delhi Shri.Renuka Devi Fort Mahura today | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेतीन शक्तीपीठे नारिशक्ती या चित्ररथाचे विशेष सादरीकरण

Nanded : प्रजासत्ताक दिनी दिल्ली कर्तव्यपथावर संचलनात गौरवलेले चित्ररथ आज माहूरात

माहूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे कर्तव्यपथावर संचलन सोहळ्यात गौरवान्वित झालेल्या महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठे नारिशक्ती या चित्ररथाचे विशेष सादरीकरण (ता.०९) मार्च रोजी माहूर येथे आयोजित करण्यात आले आहे.जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकलेल्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा व्दितीय क्रमांक मिळाला.साडेतीन शक्तीपीठावर आधारित या चित्ररथाचे प्रदर्शन खास माहूर येथे होणार असून या माहूर शक्तीपीठाच्या चित्ररथाचा सांस्कृतिक कार्यक्रम गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता रेणुका माता माहूर येथे होणार असल्याचे मंत्री सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार यांनी कळविले आहे.

प्रजासत्ताक दिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.साडेतीन शक्तीपीठे आणि नारी शक्तीचा सन्मान करणारा महाराष्ट्राचा चित्ररथ दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय.

तर उत्तराखंडच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळालाय.१७ राज्यांच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलाय.‘साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’यावर अधारित चित्ररथ होता.या चित्ररथाच्या समोर गोंधळी होते.त्याच्या मागे साडेतीन शक्तीपीठं म्हणजेच,माहूर,कोल्हापूर, तुळजापूर,आणि वणी या साडेतीन शक्तीपीठांचा देखावा

दाखवण्यात आले होते.ही सगळी शक्तीपीठं म्हणजे नारीशक्तीचा सन्मान होय.पोतराजसुद्धा चित्ररथाच्या होते. एकूणच महाराष्ट्राची लोककला या ठिकाणी सादर करण्यात आली होती.चित्ररथाचा देखावा महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांना भेट देणाऱ्या

भाविकांना, सर्वसामान्यांना पाहता येण्यासाठी हे प्रदर्शन माहूर येथे होणार आहे. डोळ्याचे पारणे फेडणारा हा प्रसंग टिपण्यासाठी माहूरकरांसह भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून सर्व नागरीकांनी व भावीकांनी या चित्ररथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

रेणुकादेवी,सप्तशृंगी,महालक्ष्मी यांच्या प्रतिकृती...

महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत.या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर,तुळजाभवानीचे श्रीक्षेत्र तुळजापूर, श्रीक्षेत्रमाहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे.त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन कर्तव्यपथापवर झाले होते.