esakal | नांदेड : सरपंच पदाचे आरक्षण आज, जिल्ह्यातील सर्वच १३०९ ग्रामपंचायतींचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यात एकूण एक हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. यात बिगर आदीवासी एक हजार १६६ तर अनुसूचित क्षेत्रात (आदीवासी) १४३ ग्रामपंचायती आहेत. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबधीत तहसीलदारांनी नेमलेल्या जागेत जाहीर होणार आहे.

नांदेड : सरपंच पदाचे आरक्षण आज, जिल्ह्यातील सर्वच १३०९ ग्रामपंचायतींचा समावेश

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : आगामी काळात सार्वत्रिक निवडणुका होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबधीत तहसील कार्यालयस्तरावर जाहीर होणार आहे. यात जिल्ह्यातील सर्वच एक हजार ३०९ ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली.

जिल्ह्यात एकूण एक हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. यात बिगर आदीवासी एक हजार १६६ तर अनुसूचित क्षेत्रात (आदीवासी) १४३ ग्रामपंचायती आहेत. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंचपदांचे आरक्षण गुरुवारी (ता. १९) संबधीत तहसीलदारांनी नेमलेल्या जागेत जाहीर होणार आहे. त्यासाठी अनुसूचित जाती, जमाती, मागासवर्गीय प्रवर्ग व खुला प्रवर्ग असा कोटा निश्चित करण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण एक हजार ३०९ ग्रामपंचायती आहेत. यात बिगर अनुसूचित क्षेत्रात १ हजार १६६ ग्रामपंचायती आहेत. तर अनूसुचित क्षेत्रात १४३ ग्रामपंचायती आहेत.

हेही वाचापदवीधर निवडणूक : मतदानासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त हे पुरावे असतील ग्राह्य -

गुरुवारी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एक हजार १६६ ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी २२८ ग्रामपंचायतीचे सरपंच पद राखीव ठेवण्यात आले आहे. तर, अनुसूचित जमातीसाठी ८२, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) ३१५ तर खुल्या गटासाठी ५४१ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात येणार आहे. आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करण्यात येणार आहे. तर अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या
ग्रामपंचायतीच्या सरपंच पदे अनुसूचित जमाती करिता निश्चित केली आहेत. त्यातील 72 पदे महिलांसाठी निश्चित केली आहेत.

सरपंच पदाचे जाहीर होणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

अर्धापूर - ४६, भोकर - ६६, बिलोली - ७३, देगलूर - ९०, धर्माबाद - ४५,
हदगाव - ११८, हिमायतनगर - ५२, कंधार - ११६, लोहा - ११८, किनवट - १३४,
माहूर - ६२, मुदखेड - ५०, मखेड - १२८, नायगाव - ८०, नांदेड - ७३, उमरी -
७३.