esakal | नांदेड : त्रिकूट येथे वाळू माफियाविरुद्ध महसूलची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नांदेड तालुक्यातील त्रिकूट येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतची माहिती नांदेड ग्रामीणचे मंडळ अधिकाऱ्याना मिळाली. त्यावरून ते पथकासोबत शासकीय वाहन घेऊन घटनास्थळाकडे जात होते.

नांदेड : त्रिकूट येथे वाळू माफियाविरुद्ध महसूलची कारवाई

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड तहसील आणि बारड पोलिसांनी सोमवारी (ता. ३०) रात्री आठच्या सुमारास नांदेड तालुक्यातील त्रिकूट येथे केलेल्या धडक कारवाईत वाळू उपसा करणाऱ्या तीन बिहारीसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

नांदेड तालुक्यातील त्रिकूट येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याबाबतची माहिती नांदेड ग्रामीणचे मंडळ अधिकाऱ्याना मिळाली. त्यावरून ते पथकासोबत शासकीय वाहन घेऊन घटनास्थळाकडे जात होते. तेव्हा त्या ठिकाणी काही अवैध वाळू उपसा करणार्‍या लोकांनी त्यांचे वाहन अडवून ठेवले. त्यांना नदीपात्रात जाण्यास मज्जाव केला. 

हेही वाचा -  नांदेड : उद्योग केंद्राच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे उद्दिष्ट- अनिल कदम -

ही माहिती नांदेड तहसिलदार किरण आंबेकर आणि उपविभागीय अधिकारी यांना दूरध्वनीवरून कळविले. त्यानंतर तहसीलदार किरण आंबेकर व नायब तहसीलदार मुगाची काकडे यांनी सदर माहिती तात्काळ जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना दिली. तोपर्यंत बारडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नांदगावकर हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्रिकूट येथे नदीपात्रात जवळ गेले तेव्हा वाळू उपसा करणारे लोक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. यावेळी श्री. नांदगावकर यांनी आजूबाजूच्या शेतामध्ये आरोपींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता यावेळी त्रिकूट येथील माधव श्रावण वडजे, पाथरड येथील विजय आवातिरक यांच्यासह तीन बिहारींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध बारड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

loading image