नांदेड : रस्ते अपघातग्रस्तांना मदतीचा हात

देशभर जीवनरक्षक तयार करण्याचा अस्थिरोग संघटनेचा मानस
Osteopathy Association
Osteopathy Association sakal

नांदेड - देशात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंची संख्या रोखण्यासाठी भारतीय अस्थिरोग संघटनेने अस्थी व सांधे आरोग्य दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर सामाजिक उपक्रमाची घोषणा केली आहे. ‘एक जीव वाचवावा’ ही थीम घेऊन संघटना वर्षभर काम करणार आहे.

२०१२ पासून भारतीय अस्थिरोग संघटना चार ऑगस्ट हा राष्ट्रीय स्तरावर अस्थी व सांधे आरोग्य दिन साजरा करते. यानिमित्त एक ते सात ऑगस्टदरम्यान देशभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. २०२२ साठी संघटना 'प्रत्येकाने रस्ते अपघातातील एक जीव वाचवावा’ हा उपक्रम राबविणार आहे. रस्त्यांवरील अपघातात होणाऱ्या मृतांची संख्या रोखणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

२०१८ च्या जागतिक आकडेवारीनुसार जगात रस्ते अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये ८६ टक्के पुरुष आहेत. यातील अनेक जण कुटुंबाचा एकमेव उत्पन्नाचा स्रोत असतात. यातील बरेचसे मृत्यू अपघातानंतर तातडीची वैद्यकीय मदत न मिळाल्याने झाले आहेत. यातील बरेचसे मृत्यू योग्य प्रकारचे प्रथमोपचार दिल्यानंतर टाळता येऊ शकतात.

परंतु,‌ सध्या अशा प्रकारच्या जीवनरक्षक प्रथमोपचार व मदतीच्या प्रशिक्षणाचा खूपच अभाव आहे. अनेक तरुण, विद्यार्थी, पोलिसांना प्रथमोपचारांचे प्रशिक्षण सहजरीत्या देणे शक्य आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेने राज्यातील हजारो विद्यार्थी, पोलिस, तरुणांना असे प्रशिक्षण देण्याचे ठरवले आहे.

राज्यात प्रशिक्षण सुरू

अस्थिरोग संघटनेच्या सदस्यांनी राज्यात एक ऑगस्टपासून प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. सात ऑगस्टपर्यंत ते दिले जाणार आहे. अशा प्रकारे देशभरच लाखो जीवनरक्षक तयार करून या प्रशिक्षणाची लिम्का बुकमध्ये रेकॉर्ड नोंदविण्याचा मानस आहे. यासोबतच हाडे आणि स्नायू बळकट ठेवण्यासंदर्भातही मार्गदर्शन केले जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष डॉ. वासुदेव गाडेगोने, सचिव डॉ. एन. जे. कर्णे, डॉ. प्रमोद शिंदे, डॉ. देवेंद्रसिंग पालीवाल डॉ. प्रल्हाद गादेवार आणि अजय पापुलवार यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com