

Nanded
esakal
नांदेड: सकाळी साडेआठची वेळ. लेबर कॉलनीतून कामासाठी निघालेला एक कर्मचारी दुचाकीवरून सावधपणे पुढे सरकतो, पण काही फुटांवरच तो रस्ता अचानक पाण्याखाली गायब होतो. त्यामुळे ब्रेक दाबतो, मागून येणारी वाहने हॉर्न वाजवू लागतात आणि काही वेळात वाहतूक कोंडी होते. काही अंतरावर लहान मुले चिखलातून वाट काढतात. एका वृद्ध महिलेला रस्ता ओलांडण्यासाठी दोन युवकांचा आधार घ्यावा लागतो.