esakal | नांदेड : आरटीओ कार्यालयाकडून या चार तालुक्यांच्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नांदेड जिल्हयातील तालुक्यांच्या ठिकाणी घेण्यात येणारे शिबीर (कॅम्प) कोव्हीड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 पासून बंद करण्यात आली होती.

नांदेड : आरटीओ कार्यालयाकडून या चार तालुक्यांच्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड:  प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्के अनुज्ञप्ती व नविन वाहन नोंदणीचे कामकाजासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात देगलूर येथे ता. 20 नोव्हेंबर रोजी, धर्माबाद येथे ता. 23 नोव्हेंबर, किनवट येथे ता. 26 नोव्हेंबर तर माहूर येथे ता.  27 नोव्हेंबर 2020 रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी घेण्यात येणारे शिबीर (कॅम्प) कोव्हीड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ता. 23 मार्च 2020 पासून बंद करण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे घेण्यात येणारे बहुतांश शिबीर कार्यालये ही तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात घेण्यात येत होती. तसेच याबाबत शिबीर कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह मिळण्यासंबंधी विचारणा केली असता बहुतांश विश्रामगृह कोव्हीड-19 महामारी संबंधी कारणासाठी अधिग्रहीत करण्यात आली होती.

हेही वाचा  नांदेड : 18 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, तर 32 कोरोना बाधितांची भर -

सद्य:स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह उपलब्ध असल्याबाबत माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे पुढील नमूद ठिकाणी व दिनांकास शिबीर कार्यालय आयोजित करण्यात येणार आहे. या शिबीर कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्के अनुज्ञप्ती व नविन वाहन नोंदणीचे कामकाज करण्यात येणार आहे. यात देगलूर येथे ता. 20 नोव्हेंबर रोजी, धर्माबाद येथे ता. 23 नोव्हेंबर रोजी, किनवट येथे ता. 26 नोव्हेंबर रोजी तर माहूर येथे ता. 27 नोव्हेंबर 2020 रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी या या शिबीराची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.

loading image