Nanded Crime: गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसासह एकाला घेतले ताब्यात
Crime News: नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ‘ऑपरेशन फ्लॅश आउट’अंतर्गत वाजेगाव ब्रीजखाली एका संशयी व्यक्तीच्या ताब्यातून गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त केले. संशयीवर शस्त्र अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली.
नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अवैधरीत्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एकाला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व एक जिवंत काडतूस असा सुमारे २६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई वाजेगाव येथील ब्रीजखाली करण्यात आली.