
शिख समाजात दशरा या सणाला अन्यनसाधारण महत्व आहे. नांदेड शहर हे शिखांची दक्षिम काशी म्हणून ओळखल्या जाते. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात.
नांदेड : सचखंड गुरुव्दावाराचा हल्लाबोल संपन्न
नांदेड : येथील सचखंड गुरुद्वाराचा हल्लाबोल मिरवणूक उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन रविवारी (ता. २५) काढण्यात आली. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. महाविर चौक येथून हल्लाबोल करत शिख भाविकांनी सचखंड गुरुद्वारा येथे मिरवणुकीचा शेवट केला.
शिख समाजात दशरा या सणाला अन्यनसाधारण महत्व आहे. नांदेड शहर हे शिखांची दक्षिम काशी म्हणून ओळखल्या जाते. सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी देश विदेशातून लाखो भाविक येत असतात. परंतु या वर्षी संबंध जगाला कोरोनाने घेरले असल्याने सर्वच धार्मिक कार्यक्रमावर शासनाने बंदी घातलेली आहे. मात्र येथील सचखंड गुरुद्वाराचे सचीव रविंद्रसिंग बुंगई यांनी हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी याचिका मुंबई उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात दाखल केली होती. दोन दिवसापूर्वी काही अटी व शर्थीवर सशर्त परवानगी दिली होती. यावरुन रविवारी दसरा सणानिमित्त हल्लाबोल मिरवणूक काढण्यात आली.
हेही वाचा - कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगी -
पंचप्यारे व निशानसाहिब सहभागी झाले होते
ही मिरवणुक सचखंड गुरुद्वारा येथून दुपारी न्यायालयाच्या आदेशावरुन दुपारी अरदास करुन काढण्यात आली. या मिरवणुकीत गुरुद्वाराचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंतसिंग यांच्यासह पंचप्यारे व निशानसाहिब सहभागी झाले होते. ट्रकमधून गुरुघरचे घोडे आभूषणाने सजवलेले घोडेही सहभागी झाले होते. नगर किर्तन करत ही मिरवणूक सायंकाळी पाच वाजता महाविर चौक येथे आल्यानंतर अरदास करुन शिख युवकांनी हल्लाबोल केला.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
गुरुद्वाराचे प्राणीसंग्रहालयात सर्व भाविकांनी जावून दर्शन घेतल्यानंतर पुढे यात्रीनिवास मार्गे ही मिरवणूकीची रात्री सचखंड गुरुद्वारामध्ये सांगता झाली. यावेळी गुरुद्वाराचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलिस अधीक्षक किशोर शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस उपाधिक्षक धनंजय पाटील, पोलिस निरीक्षक संदीप शिवले, साहेबराव नरवाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, वाहतुक शाखेचे चंद्रशेखर कदम, अनंत नरुटे यांच्यासह आदी पोलिस अधिकारी व उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची उपस्थिती होती.
Web Title: Nanded Sachkhand Gurudwara Hallabol Ends Nanded News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..