

Nanded News
sakal
नांदेड : सक्षम ताटेचा खून करण्यासाठी आरोपींना पाठबळ देऊन चिथावणी देणाऱ्या इतवारा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी सक्षम ताटेची आई आणि त्याची प्रेयसी आंचलने बुधवारी (ता.२४) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.