नांदेड - शनिवारी ३७७ रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्ण ३८४; आठ जणांचा मृत्यू 

शिवचरण वावळे
Saturday, 12 September 2020

शनिवारी (ता. १२) एक हजार ५१२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार १४४ निगेटिव्ह, तर ३८४ जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ११ हजार ९३ रुग्णसंख्या झाली आहे.

नांदेड - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. शनिवारी (ता.१२) प्राप्त झालेल्या अहवालात ३८४ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहेत. दहा दिवसांच्या उपचारानंतर ३७७ रुग्ण औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी दिल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शुक्रवारी (ता.११) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शनिवारी (ता. १२) एक हजार ५१२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार १४४ निगेटिव्ह, तर ३८४ जणांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात ११ हजार ९३ रुग्णसंख्या झाली आहे. गेल्या २४ तासात जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तामगाव (ता. हदगाव) पुरुष (वय ६५), साईनगर नांदेड महिला (वय ४८), सिडको नांदेड पुरुष (वय ७०) या तीन रुग्णासह विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यापैकी इंदिरानगर लोहा पुरुष (वय ६०), नरंगल देगलूर महिला (वय ४१), उस्माननगर नांदेड पुरुष (वय ८३) या तीन रुग्णांसह पंजाब भवन कोविड सेंटरमधील दीपनगर येथील पुरुष (वय ६०) व तरोडानाका नांदेड येथील पुरुष (वय ७४) यांचा खासगी रुग्णालयातील रुग्णासहीत आठ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यातील ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा- सोनेतारणावर फायनान्स कंपनीकडून ९० टक्के कर्ज नाही ​

तीन हजार ८६८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू 

जिल्हा रुग्णालयातील चार, शासकीय रुग्णालयातील १७, पंजाब भवन कोविड सेंटरला ११६, मुखेडचे १९, देगलूरचे सहा, भोकरचे १७, कंधारचे नऊ, धर्माबादचे २२, नायगावचे २४, उमरीचे २०, बिलोलीचे १६, मुदखेडचे १२, किनवटचे दोन, हदगावचे १७, अर्धापूरचे १६, लोहातील २५, माहूरचे १९, हिमायतनगरचे दोन, औरंगाबादला संदर्भित सात, निजामाबादला दोन, मुंबईचे एक व हैदराबाद संदर्भित चार अशा ३७७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना दहाव्या दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत सहा हजार ८६१ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या तीन हजार ८६८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३९ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 
हेही वाचा- आरेच्च नांदेडात पुरुष नसबंदीचा आकडा शोधून सापडेना, महिलांनाच घ्यावा लागतो नसबंदीसाठीही पुढाकार ​

आतापर्यंत ११ हजार ९३ जण बाधित 

शनिवारच्या अहवालात नांदेड महापालीका क्षेत्रात २३४, नांदेड ग्रामीणमध्ये पाच, मुदखेडला १२, माहूरला सात, हिमायतनगरला एक, लोहा येथे १३, बिलोलीत २३, अर्धापूरला एक, किनवटला सात, नायगावला १७, मुखेडला १४, धर्माबादला आठ, हदगावला तीन, उमरीत १९, कंधारला ११, भोकरला चार, परभणीत एक, हिंगोलीला तीन, यवतमाळला एक असे ३८४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत ११ हजार ९३ इतक्या जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

कोरोना मीटर 

एकूण बाधित रुग्ण ः ११ हजार ९३ 
शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण ः ३८४ 
शनिवारी रुग्णालयातून घरी ः ३७७ 
एकूण कोरोनामुक्त ः सहा हजार ८६१ 
शनिवारी मृत्यू ः आठ 
आतापर्यंत एकूण मृत्यू ः ३०३ 
सध्या उपचार सुरु असलेले ः तीन हजार ८६८ 
गंभीर रुग्ण ः ३९ 
प्रलंबित अहवाल ः ३९ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded - Saturday 377 patients corona-free, 384 positive patients; Eight people died