नांदेड - शनिवारी ४३ जण पॉझिटिव्ह, ४० रुग्ण कोरोनामुक्त 

file Photo
file Photo

नांदेड - मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ज्या पटीत कमी होत आहे. अगदी त्याच बरोबरीत बाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची अकडेवारी स्थिर असल्याचे दिसून येते. 


प्रयोग शाळेकडून शनिवारी (ता.पाच) प्राप्त झालेल्या अहवालात ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दुसरीकडे नव्याने ४३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात एकाही बाधितांचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार ५५९ इतकी झाली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार ५५९ वर

शुक्रवारी (ता.चार) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शनिवारी एक हजार ३८ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ९५२ निगेटिव्ह, ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - २९, नांदेड ग्रामीण - एक, लोहा - पाच, बिलोली - तीन, मुदखेड - एक, कंधार - दोन, यवतमाळ - एक आणि वसमत - एक असे ४३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २० हजार ५५९ झाली आहे. 

१३ बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर 

शनिवारी दिवसभरात विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील - एक, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - पाच, मनपा अंतर्गत एनआरआय भवन- १८, हदगाव - एक, मुखेड - सहा, देगलूर दोन आणि खासगी रुग्णालयातील सात असे ४० कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १९ हजार ४७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील तीन दिवसात एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूचा आकडा ५५० वर स्थिर आहे. विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात - १८४, तर जिल्हा शासकीय रुग्णालयात - ७५ खाटा शिल्लक आहेत. सध्या ३३९ रुग्णावर उपचार सुरु असून त्यापैकी १३ बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. 

कोरोना मीटर ः

शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ः ४३ 
शनिवारी कोरोनामुक्त रुग्ण ः ४० 
शनिवारी मृत्यू ः शुन्यू 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ः २० हजार ५५९ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण ः १९ हजार ४७६ 
एकूण मृत्यू ः ५५० 
गंभीर रुग्ण ः १३ 
उपचार सुरू ः ३३९ 
स्वॅब अहवाल प्रतिक्षेत ः ४८७ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com