
शनिवारी एक हजार ८९३ अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार ७९९ निगेटिव्ह तर ६१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
नांदेड - जिल्ह्यात शनिवारी (ता.२८) ७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. तर ६१ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्यावरुन ९४ टक्यावर आले आहे.
शुक्रवारी (ता.२७) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी शनिवारी एक हजार ८९३ अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार ७९९ निगेटिव्ह तर ६१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार ३२५ वर पोहचली आहे. आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संपर्क केला, मेसेज केला परंतू, बातमी पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडुन कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
हेही वाचा- जिल्हा प्रशासन पदवीधर मतदान प्रक्रीयेसाठी सज्ज-जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
आतापर्यंत ५४८ जणांचा मृत्यू
शनिवारी मुदखेड तालुक्याकील डोंगरगाव येथील महिला (वय ६०) यांच्यावर विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात उपचारानंतर विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - दोन, जिल्हा शासकीय रुग्णालयातील - पाच, एनआरआय भवन - गृहविलगीकरण ३२, हदगाव - दोन, नायगाव - एक, बिलोली - तीन, अर्धापूर - सात, भोकर - चार आणि खासगी रुग्णालयातील १५ असे ७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले आहे.
हेही वाचले पाहिजे - नांदेड : राज्यातील सर्व न्यायालये एक डिसेंबरपासून दोन सत्रात सुरु होणार
७९३ स्वॅबची तपासणी सुरु
आतापर्तंय १९ हजार १८० पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दुसरीकडे नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - २९, नांदेड ग्रामीण - दोन, धर्माबाद - एक, मुखेड - १२, किनवय - एक, हदगाव - तीन, लोहा- तीन, देगलूर - नऊ आणि निजामाबाद एक असे ६१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकुण संख्या २० हजार ३२५ इतकी झाली आहे. त्यापैकी १९ हजार १८० रुग्ण कोरोनामुक्त आणि ५४८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४०४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १५ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ७९३ स्वॅबची तपासणी सुरु होती.
कोरोना मीटर
आज पॉझिटिव्ह रुग्ण - ६१
आज कोरोनामुक्त - ७१
आज मृत्यू - एक
एकुण पॉझिटिव्ह - २० हजार ३२५
एकुण कोरोनामुक्त - १९ हजार १८०
एकुण मृत्यू - ५४८
उपचार सुरु - ४०४
गंभीर रुग्ण - १५
स्वॅब अहवाल येणे बाकी - ७९३
----