नांदेड : मालेगावमध्ये एसबीआय बँकेचा सायरन वाजला आणि पुढे हे घडले....

अमोल जोगदंड
Thursday, 17 September 2020

मात्र बँकेच्या सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेले सायरन वाजल्याने चोरट्यांनी सदर ठिकाणाहून पळ काढला. परंतु चोरटे बँकेच्या सीसीटीवी कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. 

मालेगाव (जिल्हा नांदेड) : अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथे नांदेड रस्त्यावर असलेली स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा अज्ञात चोरट्यांनी ता. १५ सप्टेंबरच्या मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेच्या सुरक्षिततेसाठी बसवण्यात आलेले सायरन वाजल्याने चोरट्यांनी सदर ठिकाणाहून पळ काढला. परंतु चोरटे बँकेच्या सीसीटीवी कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. 

मालेगाव परिसरात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिस प्रशासन भलत्याच कामात व्यस्त असल्याने चोरटे या भात सक्रीय झाले आहे. विशेष म्हणजे मालेगाव येथे मुख्य रस्त्यावर पोलीस चौकी आहे. मात्र चौकीतील पोलिस गस्त घालत नसल्याने याचा फायदा चोरट्यांना होत आहे. या भागातील जनावरे, घरफोडी, शेती अवजारे पळविण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. तसेच या परिसरातील अनेक शेतातील आखाड्यावर मटका, जुगार णि अवैध दारु विक्री केल्या जाते. या अवैध धंदेवाल्यांना अर्धापूर पोलिसांची मुकसंमती असल्याचे दिसुन येते. 

हेही वाचा मराठवाडा (हैदराबाद) मुक्तीसंग्रामाचा दैदिप्यमान लढा...

बँक मॅनेजर व पोलीस प्रशासनाने सदर घटनेची पाहणी 

मुख्य रस्त्यावर असलेली एसबीआय बँकेची शाखा ता. १५ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न फसला आहे. सदरची घटना ता. १६ सप्टेंबर रोजी सकाळी साडे नऊच्या दरम्यान बँक उघडणय्साठी आलेला सेवक सुभाष कांबळे यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच मॅनेजर यांना कळवले. त्यानंतर बँक मॅनेजर व पोलीस प्रशासनाने सदर घटनेची पाहणी केली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मालेगाव शाखेत सुरक्षा रक्षक नसल्याने सदर घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अर्धापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे हे आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. पंचनामा करुन बँक व्यवस्थापक अतुल कडबे यांच्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: SBI Bank's siren sounded in Malegaon and it happened later nanded news