esakal | नांदेड : मुखेड येथील दशरथेश्‍वर मंदीराचे शिल्प वैभव ऐतिहासीक ठेवा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुखेड येथील येथील अप्रतीम असलेल्या स्थापत्य- शिल्पात असलेल्या दशरथेश्‍वर देवालयाला भेट द्यावी लागते. तेथे गेल्यानंतर यादव कालीन स्थपत्य शिल्प काय आहे याची प्रचीती येते.

नांदेड : मुखेड येथील दशरथेश्‍वर मंदीराचे शिल्प वैभव ऐतिहासीक ठेवा

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील चालुक्य- यादव कलेचा अविस्कार व देखावा पाहायचा असेल तर मुखेड येथील येथील अप्रतीम असलेल्या स्थापत्य- शिल्पात असलेल्या दशरथेश्‍वर देवालयाला भेट द्यावी लागते. तेथे गेल्यानंतर यादव कालीन स्थपत्य शिल्प काय आहे याची प्रचीती येते. ही कला पाहून गेलेल्या भक्ताचा पाय घराकडे वळत नाही. ही कलाकृती पहातच मनाला शांती मिळते. श्रावण सोमवारनिमित्त या ठिकाणी भक्तांची मांदीयाळी मोठ्या संख्येने पहावयास मिळते. 

मुखेड येथील दशरथेश्वराचे देवालय हे यादव स्थापत्य- शिल्प कलेचा श्रेष्ठतप अविष्कार ठरावा. मंदिर अजूनही चांगल्या अवस्थेत आहे आणि बरेचसे शिल्पवैभव आपले कलासौंदर्य कायम टिकवून आहेत. बाह्य भिंतीवरील मूर्तीशिल्पे उल्लेखनीय आहेत. विशेषतः सप्तमातृका शिल्प अधिक रेखीव ठरावीत. नृत्यगणेश,विष्णुलक्ष्मी, अर्धनारीनटेश्वर आदी मूर्तीशिल्पांचा उल्लेख महत्वाचा आहे. मंदीराचे स्थापत्य, यादव कलास्थापत्य परंपरेचे सातत्य दर्शविणारे तर शिल्पकला चालुक्यांचा प्रभाव व्यक्तविणारी कला आहे.

हेही वाचा नांदेड : का वाढत आहेत विवाहितांच्या छळांच्या घटना ?

यादव, चालुक्य काळातील शिलालेख 

महामंडपातील खांबावरील शिल्पकारीही वैशिष्ट्य पूर्ण आहे. या देवलयातील कलेचा आविष्कारच एवढा समर्थ आहे की, या कलेचा मूळस्तोत्र आणि परंपरा स्पष्टपणे लक्षात याव्यात. यादव, चालुक्य काळातील कुठलाही शिलालेख आजून पावेतो येथे सापडला नसल्याने कलापरंपरा हाच या अभ्यासाचा प्रमुख आधार राहणार. नांदेड पासुन ७० किलोमिटर अंतरावर मुखेड हे तालुक्याचे ठिकाण असुन जुन्या वस्तीत हे शिवालय असुन शेजारी भव्य अशी बारव देखिल आहे. गाळ काढुन साफसफाई करुण स्वच्छ केल्यास येथील पाणीसाठ्याचा उपयोग  होवु शकतो अशी माहिती डॉ. प्रभाकर देव यांनी दिली असून या शिल्प कलेची छायाचित्र विजय होकर्णे यांनी टीपली आहेत.
 
भक्तांना पावणारे देवालय

श्रावण सोमवारनिमित्त या देवालयाला नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यासोबतच कर्नाटक राज्यातील बीदर, तेलंगनातील निर्मल, निझामाबाद, म्हैसा, बोधन आदी परिसरातूनही भक्त येत असतात. यादव कालीन व हेमाडपंथी कला पाहण्यासाठी बरीच विद्यार्थी मंडळीही या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. मात्र या वर्षी कोरोनमाचे संकट आल्याने गर्दी कमी झाली आहे.