esakal | नांदेड : अतिवृष्टीधारकांना २८२ कोटींचा दुसरा हप्ता वितरीत; दोन टप्यात मिळाले ५६५ कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हा निधी संबधीत तालुकास्तरावरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली. जिल्ह्याला दोन हप्त्यात ५६५ कोटी १३ लाख ३३ हजाराचा निधी मिळाला आहे.

नांदेड : अतिवृष्टीधारकांना २८२ कोटींचा दुसरा हप्ता वितरीत; दोन टप्यात मिळाले ५६५ कोटी

sakal_logo
By
कृष्णा जोमेगावकर, प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पहिल्या टप्यात २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले होते. त्याचे वितरण झाल्यानंतर शुक्रवारी (ता. आठ) २८२ कोटी ५६ लाच ६७ हजाराचा निधी प्राप्त झाला. यानंतर लगेच शुक्रवारी सर्वच सोळा तालुक्यांना वितरीत करण्यात आला. हा निधी संबधीत तालुकास्तरावरुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळाली. जिल्ह्याला दोन हप्त्यात ५६५ कोटी १३ लाख ३३ हजाराचा निधी मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्याच्या कालावधीत सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे उडीद, मुगासह सोयाबीन, कापूस, ज्वारी या जिरायती पिकासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने पुन्हा तडाखा दिला. यात पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टरवरील जिरायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अहवाल यंत्रणेने पाठविला होता. यात शासनाच्या प्रचलित धोरणानुसार शेतकऱ्यांना भरपाइ देण्यासाठी शासनाच्या सुधारीत दरानुसार जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार ५१८ हेक्टर बाधीत क्षेत्रासाठी ५६५ कोटी १३ लाख रुपये निधी लागणार होता. यानुसार पहिल्या टप्यात २८२ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले होते. त्याचे वितरण झाल्यानंतर शुक्रवारी (ता. आठ) २८२ कोटी ५६ लाच ६७ हजाराचा निधी प्राप्त झाला.

हेही वाचा -  नांदेडमध्ये हायटेक शेती : चिंतलवार हे शेतकरी घेत आहेत जिरेनियमचे सुगंधी वनस्पती पीक

यानंतर लगेच शुक्रवारी सर्वच सोळा तालुक्यांना वितरीत करण्यात आला. जिल्ह्याला दोन टप्यात ५६५ कोटी १३ लाख ३३ हजाराचा निधी मिळाला आहे.
शुक्रवारी (ता. सहा) आलेल्या दुसऱ्या टप्यातील २८२ कोटी ५६ लाख निधी जिल्हा प्रशासनाने सर्व सोळा तालुक्यांना वितरीत केला आहे. यामुळे हा निधी संबधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होइल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.

तालुकानिहाय वितरीत केलेला दुसऱ्या टप्यातील निधी
(कंसात दोन टप्यातील एकूण निधी)

नांदेड- १० कोटी ३३ लाख (२० कोटी ६६ लाख), अर्धापूर- आठ कोटी ५१ लाख (१७ कोटी ०२ लाख), कंधार- २० कोटी ७६ लाख (४१ कोटी ५३ लाख),
लोहा- २६ कोटी ३६ लाख (५२ कोटी ७२ लाख), बिलोली- १६ कोटी २० लाख (३२ कोटी ४१ लाख), नायगाव - १९ कोटी १९ लाख (३८ कोटी ३९ लाख),
देगलूर- २२ कोटी ४१ लाख (४४ कोटी ८२ लाख), मुखेड- २४ कोटी ४० लाख (४८ कोटी ८१ लाख), भोकर- १९ कोटी ५७ लाख (३९ कोटी १५ लाख),
मुदखेड- सात कोटी ३९ लाख (१४ कोटी ६९ लाख), धर्माबाद- १० कोटी २३ लाख (२० कोटी ४७ लाख), उमरी- १४ कोटी ३७ लाख (२८ कोटी ७५ लाख), हदगाव- ३२ कोटी ८१ लाख (६५ कोटी ६२ लाख), हिमायतनगर- १५ कोटी ८९ लाख (३१ कोटी ८८ लाख), किनवट- २४ कोटी २३ लाख (४८ कोटी ४७ लाख), माहूर- नऊ कोटी ८३ लाख (१९ कोटी ६७ लाख).
 

loading image