नांदेड - मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना शहरानंतर तिसरे महत्त्वाचे उद्योग केंद्र म्हणून नांदेडचा विकास होणार आहे. नांदेड महाराष्ट्राचे प्रमुख शहर होऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले..नांदेड शहरातील इंदिरा गांधी मैदानावर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. पाच) त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, आमदार भीमराव केराम, आमदार तुषार राठोड, आमदार श्रीजया चव्हाण, जितेश अंतापूरकर, राम पाटील रातोळीकर, चैतन्यबाबू देशमुख, जिल्हाध्यक्ष संतुक हंबर्डे, किशोर देशमुख उपस्थित होते..२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी रोजगार निर्मिती, शैक्षणिक संस्था, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना, अमृत शहर योजना यासह शहरांच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला.त्यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळाली. गुरुत्तागद्दी काळात अशोकरावांनी कामे आणली. पण, केंद्राकडून त्या तुलनेत निधी मिळाला नाही. भाजपने विकसित नांदेडचा संकल्पनामा तयार केला आहे. हा संकल्पनामा पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले..विकासाचे स्वप्न पूर्ण करू - पंकजा मुंडेनिवडणुकीमध्ये दिलेला वचननामा पूर्ण करणे शक्य होत नाही. पण, नांदेडच्या विकासाचा संकल्पनामा केला असून हा संकल्पनामा सिद्धीकडे नेण्यासाठी प्रयत्न आहे, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या..दळणवळणांच्या सुविधागेली ७० वर्षे राज्यकर्त्यांना शहरांचा विसर पडल्याची टीका फडणवीस यांनी केली. नांदेडहून विमान, रेल्वे यासह इतर दळणवळणांच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. नांदेड-लातूर, नांदेड-बिदर रेल्वेमार्गाचे काम सुरू होणार असून नांदेडला १५० खाटांचे कर्करोग रुग्णालय लवकर कार्यान्वित होईल, असेही ते म्हणाले..नांदेड होणार स्मार्टमहापालिकेत भाजपची एकहाती सत्ता दिल्यास स्मार्ट सिटी, सुरक्षित सिटी करण्यासाठी निधी कमी पडून देणार नाही. महाराष्ट्रात आजपर्यंत ५० लाख लाडक्या बहिणी लखपती दीदी झाल्या आहेत. एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.