esakal | नांदेड : शिवणी व परिसराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल; गेल्या आठ दिवसात एकही रुग्न नाही

बोलून बातमी शोधा

कोरोनामुक्तीकडे
नांदेड : शिवणी व परिसराची कोरोना मुक्तीकडे वाटचाल; गेल्या आठ दिवसात एकही रुग्न नाही
sakal_logo
By
विठ्ठल लिंगपुजे

शिवणी (जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी येथिल प्राथमिक आरोग्य केंन्द्राअंतर्गत चार उपकेंन्द्र आहेत. शिवणी या गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आजपर्यंत एकूण सोळाशे 80 जणांचे लसीकरण झाले असून शिवणी या गावात सातशे जणांचे लसीकरण झाले.

जगभरात कोरोनाने धुमाकुळ घातला. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असताना रोज हजारो रुग्न आढळत आहेत. मृत्युचा आकडाही जास्त असताना मात्र शिवणी व परिसर यापासुन दुर आहे. विस दिवसापुर्वी शिवणी येथिल तिस रुग्नाची भर पडली होती. त्या रुग्नाणा काँरन्टाईन करुन डाँक्टरच्या सल्यानुसार उपचार करण्यात आले. त्यामुळे 15 दिवसानंतर त्या रुग्नांची तपासणी केली असता त्या रुग्नाची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. असे वैद्यकीय अधिका-याकडुन सांगण्या आले.

कोरोना प्रतीबंधात्मक लस घेतल्यानंतर या परिसरात आजपर्यंत कोरोनामुळे एकाही रुग्नाचा मृत्यू झालेला नाही. कारण शिवणी येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी यांनी अंतर्गत येणाऱ्या गावातील हिवताप व सर्दी असणाऱ्या रुग्णांचा सर्वे करून ज्या रुग्णाला हिवताप व सर्दी असेल अशा रुग्णाला घरीच गोळ्या औषध दऊन उपचार केल्याने या भागात मागील काही दिवसापासून रुग्णांची भर पडत नाही. त्यामुळे डाॅ. कानिफनाथ मुंडे व डॉक्टर पोगे यांनी गावागावात जाऊन ध्वनीक्षपकाद्वारे लस घेण्याचे आव्हान करीत आहेत. नागरिकांनी मास्क, सँनिटायझर व वारंवार हात धुणे सुरक्षित अंतराचे पालन करावे असे आवाहन करीत आहेत. तपासणी किट नसल्याने सध्या तपासणी बंद आहे. येत्या दोन दिवसात तपासणी किट येणार आहेत आले की तपासणी चालू करणार आहोत असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे