Nanded Airport

Nanded Airport

sakal

Nanded Airport: नांदेड विमानतळासाठी १३१ कोटी मंजूर; धावपट्टी, अंतर्गत सुविधा, सुरक्षा व्यवस्था होणार सक्षम

Nanded Airport Development Fund: नांदेड येथील श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळाच्या दुरुस्ती व विकासासाठी १३१ कोटींच्या निधीस मंजुरी मिळाली. धावपट्टी व अंतर्गत सुविधांचे नूतनीकरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीमार्फत टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे.
Published on

नांदेड : येथील श्री गुरुगोविंदसिंगजी विमानतळाची दुरुस्ती व सर्वांगीण विकासासाठी १३१ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे धावपट्टीसह अंतर्गत सुविधांचे नूतनीकरण आणि विस्ताराचे काम हाती घेण्यात येणार आहे. या निधीसाठी आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी गेल्या तीन वर्षांपासून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com