नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलनsakal

नांदेड : राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने शुक्रवारी (ता. २९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा दिन म्हणून राज्यव्यापारी ठिय्या आंदोलन केले. आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन कार्यालयास सादर करण्यात आले.

नांदेड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
T20 WC : पाकिस्तानची विजयी हॅटट्रिक, अफगाणिस्तानने संधी गमावली!

राज्य शासनाने ता. एक नोव्हेंबर २००५ पासून राज्य कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी पेन्शन योजना (डीसीपीएस) लागू केली आहे. २०१५ पासून या योजनेचे रुपांतर राष्ट्रीय पेन्शन योजनेत (एनपीएस) झाले. गेल्या १६ वर्षापासून एनपीएसचे कर्मचारी कमालीचे अस्वस्थ आहेत. जुनी एनपीएस योजना रद्द करावी तसेच केंद्राने दिलेले लाभ राज्यात लागू करावेत, या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करून राष्ट्रीय पेन्शन योजना हटवा दिन राज्यात सरकारी, निमसरकारी कार्यालयासमोद निदर्शने करून पाळण्यात आला.

यावेळी एक तासाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महसूल, जलसंपदा, कृषी आदींसह इतर विविध विभागाचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते. महसूल विभागाचे अध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांच्यासह इतर पदाधिकारी यांनी आंदोलनानंतर मागण्यांचे निवेदन सादर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com