esakal | नांदेड : शिवणी परिसरात उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला

बोलून बातमी शोधा

file photo}

पावसाळी ज्वारीचे पीक न घेता शेतकऱ्यांचा रब्बी ज्वारीकडे कल

नांदेड : शिवणी परिसरात उन्हाळी ज्वारीचा पेरा वाढला
sakal_logo
By
विठ्ठल लिंगपूजे

शिवणी ( ता. किनवट, जिल्हा नांदेड ) : किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून पावसाळी ज्वारीचे पीक न परवडणारे झाल्याने अनेक शेतकरी ज्वारीचे पीक घेण्याचे टाळत आहेत. कारण शिवणी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्याने जंगली प्राण्यांकडुन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्याला शेती पिकाचे रक्षण करणे अवघड होत होते.

ज्वारीचे पिक काढणीला आले की पक्षाचे थवेचे थवे ज्वारी पिक खाऊन नष्ट करायची पक्षाची व वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना एक दोन महिन्याचा कालावधी लागायचा. त्यामुळे शेतकरी कंटाळून पावसाळी ज्वारीचे पीक घेण्याचे टाळत होते. त्यामुळे शेतकरी रब्बी ज्वारीचे पीक घेण्यास सुरुवात केली. कारण शेतक-यांना वर्षातून एकवेळ ज्वारीचे पीक घ्यावेच लागते.

ज्वारी खाण्यासाठी व जनावरांना चाऱ्यासाठी ज्वारीचे पीक महत्त्वाचे असल्याने रब्बी पिककमध्ये ज्वारीचे पीक घेतल्याने ज्वारी ही पांढरी व कडबाही पांढरा होत असल्याने जनावरांना चाराही चांगला मिळत असल्याने शेतकरी कमी पाण्यात येणारे टाळकी ज्वारीचे पीक घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे या वर्षी शिवणी परिसरात टाळकी ज्वारीचे पीक बहरले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे