
Nanded : श्री श्री रविशंकरजी यांचे उत्स्फूर्त स्वागत
नांदेड : ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रवीशंकरजी यांचे नांदेडला बुधवारी (ता. एक) दुपारी विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह इतरांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी साधकांची मोठी उपस्थिती होती. रस्त्याच्या दुतर्फा उभारूनही अनेकांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री श्री रवीशंकरजी यांनी माजी मुख्यमंत्री चव्हाण तसेच खासदार चिखलीकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांची पाद्यपूजा करण्यात आली.
कौठा भागातील मामा चौक येथील मैदानावर श्री रवीशंकरजी यांचा गुरुवाणी महासत्संग सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी ते बुधवारी सकाळी कोल्हापूर येथून नांदेड येथे विमानतळावर आले. यावेळी त्यांचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, प्रविण साले, दिलीप कंदकुर्ते, चैतन्य देशमुख, मिलिंद देशमुख, किशोर स्वामी आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील आनंद निलयम येथील निवासस्थानी श्री श्री रवीशंकरजी यांनी भेट दिली. यावेळी श्री. चव्हाण आणि माजी आमदार अमिता चव्हाण यांनी स्वागत केले. यावेळी माजी मंत्री डी. पी. सावंत, आमदार मोहन हंबर्डे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार जितेश अंतापूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी सभापती किशोर स्वामी, प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दुपारी खासदार चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साई सुभाष येथे त्यांनी भेट दिली. चिखलीकर यांनी निवासस्थानी आपल्या कुटुंबीयांसह त्यांची पाद्यपूजा केली. यावेळी खासदार चिखलीकर यांच्यासह प्रतिभाताई चिखलीकर, प्रणिता देवरे चिखलीकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी पंकज देवरे, डॉ. प्रमोद चिखलीकर, डॉ. माया चिखलीकर, प्रवीण चिखलीकर, वैशाली चिखलीकर, ॲड. संदीप चिखलीकर, सोनाली चिखलीकर, सुजाता चिखलीकर यांनी श्री. रवीशंकरजी यांची पाद्यपूजा केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.