esakal | नांदेडला दुसऱ्या दिवशी परिचारीकांचे काळ्या फिती लावून काम सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

मागील पाच महिन्यापासून डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना वार्डात काम करणाऱ्या ब्रदर, परिचारिकांना एकही दिवस सुटी मिळत नसल्याने त्यांच्यावर कामाचा तान वाढुन त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न तर निर्माण झाला आहे.

नांदेडला दुसऱ्या दिवशी परिचारीकांचे काळ्या फिती लावून काम सुरु

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - डॉक्टराच्या बरोबरीने कोरोना वार्डात रुग्णांची देखभाल करत असलेल्या परिचारिका यांना मात्र डॉक्टरांच्या बरोबरीने काम करावे लागत आहे. मात्र अर्धा अधिक भार परिचारिकांच्या खांद्यावर असला तरी, डॉक्टरांनप्रमाणे त्यांना एक आठवडाभर रुग्णसेवा दिल्यानंतर विश्रांतीसाठी (क्वारंटाईन) सुटी दिली जात नाही. म्हणून मंगळवार (ता.एक) सप्टेंबरपासून एक आठवडा सात दिवसासाठी क्वॉरटाईन होण्यासाठी सुटी दिली जावी या मागणीसाठी परिचारीका व ब्रदर यांनी काळ्या फिती लावून काम सुरु केले आहे.

मागील पाच महिन्यापासून डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून कोरोना वार्डात काम करणाऱ्या ब्रदर, परिचारिकांना एकही दिवस सुटी मिळत नसल्याने त्यांच्यावर कामाचा तान वाढुन त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न तर निर्माण झाला आहे. शिवाय सतत कोरोना वार्डात ड्युटी करावी लागत असल्याने अनेक परिचारिकांना घरी गेल्यानंतर आपल्या लहान मुले आणि कुटुंबापासून समांतर अंतर ठेवून रहावे लागत आहे. कामातुन सुटी मिळत नसल्याने त्यांच्या मानसिक स्वस्थावर देखील परिणाम दिसून येत असून, कोरोना वार्डात काम करणाऱ्या या ब्रदर, परिचारिकांसोबत होत असलेल्या अन्यायाविरोधात संघटनेच्या वतीने आवाज उठविण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा- शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन ​

शासनाकडून अजूनही दखल नाही

महाराष्ट्र परिचारिका संघटना नांदेडच्या वतीने काहि दिवनसापूर्वी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व नांदेड दक्षिणचे आमदार मोहन हंबर्डे यांना निवेदन देऊन परिचारिकांसोबत होत असलेल्या भेदभावाची व्यथा मांडली होती. एक दिवस काम बंदचा इशारा देखील दिला होता. परंतू त्यांनी दिलेल्या निवेदनाची अजून देखील पुरेशीदखल घेण्यात आली नाही. त्यामुळे मंगळवारी महाराष्ट्र परिचारिका संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून काम काम करण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी कामावर जाण्यापूर्वी सर्व परिचारिका व ब्रदर्स यांनी मिळून मागण्यासाठी जोरदार घोषणा बाजी करत आबकी बार आर या पार असे म्हणत काळ्या फिती लावून काम सुरु केले आहे.

हेही वाचा- नांदेडमध्ये कोरोनाचे थैमान : 312 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू, रुग्ण संख्या पोहचली सात हजारावर​

काम बंद आंदोलानाची वेळ आली तर रुग्णासाठी वेगळी टिम असेल

ता.सात सप्टेंबर पर्तंत काळ्या फिती लावून काम सुरु राणार असून, ता. आठ सप्टेंबरला एक दिवस काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. काम बंद आंदोलनादरम्यान कोविड योद्धा म्हणून परिचारिकांची वेगळी टिम कोरोना वार्डात कर्तव्यावर असणार आहे. त्यामुळे संपादरम्यान एकाही रुग्णास त्रास होणार नाही. यासाठी देखील खबरदारी घेतली जाणार असल्याचे देखील संघटनेच्या सदस्याने सांगितले.

loading image