

Nanded News
esakal
नांदेड: शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पथदिवे बंद राहण्याचा गंभीर प्रश्न समोर आला असून, अंधाराच्या आडून गुन्हेगारांना अक्षरशः अभय मिळत असल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवसांत सलग पाच खून झाल्याच्या घटनांनी शहर हादरले असताना दुसरीकडे अनेक प्रमुख रस्ते अंधारात बुडालेले दिसत आहे. या परिस्थितीमुळे कायदा व सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.