esakal | नांदेड : अनाथ गंगासागरच्याा जिद्दीचा प्रवास; प्रशासकीय सेवेचं स्वप्न
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परंतु गंगासागरची संघर्षाची कहाणी आहे. तिचा जन्म होताच आई जग सोडून गेली. ती सहा महिन्याची असतांना वडीलंही गेले. आता गंगासागरचं जगात कोणीही नव्हततं.

नांदेड : अनाथ गंगासागरच्याा जिद्दीचा प्रवास; प्रशासकीय सेवेचं स्वप्न

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक लाभाच्या योजना सर्वसामान्यांसाठी आहेत. त्यामधील एक योजना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय होय. याच विद्यालयातून शिक्षणाचा लाभ घेऊन बिलोली तालुक्यातल्या चिटमोगरा येथील गंगासागरनं जिद्दीनं शिक्षण घेवून उज्वल यश मिळवलं आहे. परंतु गंगासागरची संघर्षाची कहाणी आहे. तिचा जन्म होताच आई जग सोडून गेली. ती सहा महिन्याची असतांना वडीलंही गेले. आता गंगासागरचं जगात कोणीही नव्हततं. आता हिला ठेवून काय करायचं. टाका तिला बापाच्या चित्तेवर... नातेवाईकांचा हा निर्णय तिचा परतपाळ करणा-या तेजूबाईला पटला नाही. हीचा परतपाळ मी करेन म्हणून तिला ओटीत घेतलं...       

तेजूबाईचं पूर्ण नावं तेजूबाई हणमंत कोकणे. गंगासागरच्या वडीलाची आत्या. पण ती गंगासागरची आईच झाली. कोकणे दांपत्यांकडे शेती नव्हती. जातीनं धनगर असल्यानं परंपरागत शेळ्या मेंढ्यांचा व्यवसाय होता. आजारपणानं शेळ्या मरत, त्यामुळं इतरांच्या शेतीवर शेतमजूरी तसेच हाती पडेल ती कामं करुन त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. तेजूबाईला चार मुलं. मुलगी नाही म्हणून हीच मुलगी म्हणून परतपाळ करतांना चिटमोगराच्या जिल्हा परिषद शाळेत तिचं नाव टाकलं. पाचवीपर्यंत शिक्षण झालं. पुढंच शिक्षण गावात नसल्यालमुळं गंगासागरच शिक्षण थांबणार होतं. पण तिला पुढ कसं शिकवावं हा विचार तेजूबाईला पडला. ती हुशार असल्यामुळं तिनं शिक्षण घ्याव असं शाळेतील शिक्षकांनाही वाटू लागल. केंद्रप्रमुख शेख सर यांनी तेजूबाईच्या घरी जाऊन जिल्हा परिषदेअंतर्गत अनाथ, अल्पलसंख्यांक, एस. सी., एस. टी. शाळाबाह्य मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे. येथे निवासासह भोजन व शिक्षणाची सोय केली जाते अशी माहीती दिली. आता तेजूबाईनं शाळेतील शिक्षकांच्याा मदतीनं गंगासागरच्या पुढील शिक्षणासाठी बिलोली येथील कस्तुारबा गांधी बालिका विद्यालयात अर्ज केला अन् ह्या शाळेत गंगासागर शिकू लागली. परंतू दरम्यान तेजूबाईच्या नव-याचं निधन झाल्यामुळे त्यां चा  मोठा आधारवड गेला. त्यामुळे त्या खचल्या पण सावरल्यायही....

स्पर्धा परिक्षेतून प्रशासनात जायच

तेजूबाईला हालाखीच्या परिस्थितीमुळ गंगासागरला शिक्षण देता येतं नव्हत. परंतु कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा आधार मिळाला. यामुळे तिच्या जिवनाला नवा आकार मिळाला. शिस्त लागली, आत्मविश्वाास जागा केला अन् जगण्याचं भक्कम आधार दिला. या आधाराचा फायदा घेत गंगासागरन अभ्यालसासह वकृत्वव स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा अशा विविध स्पर्धात बक्षीसं मिळवली. दहावीतही 78 टक्के मार्क घेऊन विशेष प्राविण्यासह ती पास झाली. दहावीपर्यंत मोफत शिक्षणाचा लाभ मिळाला. परंतु आता मात्र पुढील शिक्षण घेता येणार नाही, हे नक्की होतं.. तिचं लग्न  करण्याचा विचार झाला. पण तत्कालीन गट शिक्षणाधिकारी माधव सलगर व त्यांच्या सहका-यानी शंकरनगर येथील गोदावरी मनार महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश दिला. तिथंही गंगासागरनं बारावी परिक्षेत उत्तम गुण संपादन केले. त्याननंतर नर्सींगचा अभ्याीसक्रमही पूर्ण केला. तिला General Nursing and Midwifery च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्याावयाचा आहे. त्यासाठी सत्तर हजार रुपये खर्च येणार आहे. त्याामुळे गंगासागरनं लातूरच्या खाजगी रुग्णालयात नौकरी पत्कारली. सात ते आठ हजार रुपये मिळतात. यातूनच खाजगी हॉस्टेल व मेसचा खर्च ती भागवते. तेजूबाईच्या चार मुलापैकी एक मुलगा आजारपणात दगावला. तिघांची लग्न झाली आणि ते स्वतंत्र राहतात. तेजूबाईचं वय आता साठीत आहे. त्यांचा खरा आधार गंगासागरचं आहे. गंगासागरची फार मोठी स्वप्न आहेत. तिला कायद्याचे शिक्षणही घ्याायचं आहे. स्पर्धा परिक्षेतून प्रशासनात जायच आहे... त्या‍साठी खाजगी नौकरी करुन दिवस-रात्र अभ्यास ती करत आहे.

माझ्यासाठी जीने कष्ट उपसले तिला आता सुखी ठेवून तिचा मी आधार होईल

गंगासागरचं खर नावं गंगासागर गोविंद कापीले आहे. परंतू तेजूबाईनं तिचं नाव दिलं. गंगासागर हणमंत कोकणे.. आत तिचं आडणाव कोकणेच... जेव्हातिचं बारावीचं शिक्षण झालं तेव्हा नातेवाईक म्हणत. आता गंगासागरचं लग्न लावून द्या. तुम्ही तिचा खूप सांभाळ केला आणि तिला शिकवलं. हे ऐकूण गंगासागरनं तेजूबाईला प्रश्न् विचारला हिला वाढवलं, शिकवलं... परतपाळ केला... असं लोकं का म्हणत आहेत. हे तर प्रत्येक आईच कर्तव्यच आहे. तेव्हात गंगासागरला तेजूबार्इनं तिच्या जिवनाची खरी कहाणी सांगितली. तेव्हापर्यंत तिलाही हे माहित नव्हत. अनाथाची माय म्हणून तेजूबाई माझी आई झाली. गायीचं दूध पाजवून.. चितेवर फेकून देतांचा मला मृत्यूच्यां दाढेतून काढून नवजिवन देणा-या माझ्या आईला मी कधीच विसरू शकणार नाही. माझ्यासाठी जीने कष्ट उपसले तिला आता सुखी ठेवून तिचा मी आधार होईल. अशी प्रतिक्रीया गंगासागरनं दिली आहे. मुलीचा जन्म म्हणजे कटकट.. वंशासाठी मुलगाच हवा.. या मानसिकतेची लोकं अजूनही आहेत. परंतू अशाही परिस्थितीत मला मुलगी माणून माझ्या तेजूआईनं माझा सांभाळ केला. शिक्षणासाठीही पुढाकार घेतला. एक मुलगी शिकली की कुटुंब शिकतं, कुटुंब शिकलं की समाज आणि समाज शिकलाकी देश प्रगतिपथावर जातोय. आज शासनाच्या  विविध योजनांचा लाभ मिळतं असल्यामुळेच हे शक्य झालं. 
शब्दांकन- मिलिंद व्यवहारे

संपादन - प्रल्हाद कांबळे