
आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते प्राणी त्यांची पूर्ण परतफेड करत असतात. आपण आपल्या आसपास अनेक पक्षी व प्राणी मित्र पाहिले आहेत. त्याप्रमाणे असेच काहीसे पण थोडे वेगळे प्राणिमित्र आढळून आले आहेत.
नांदेड : अडीच हजार वर्षांपूर्वी भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आहे की पशु प्राण्यावर व निष्पाप प्राण्यांचा जीव न घेणे पशु व पक्षी यांना दिलेले दान सात पटीने लाभ करणारे असते. त्या अनुसरुन सध्याच्या आधुनिक युगात माणूस माणसाला ओळखायला तयार नाही. आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा मुक्या प्राण्यांना जीव लावला तर ते प्राणी त्यांची पूर्ण परतफेड करत असतात. आपण आपल्या आसपास अनेक पक्षी व प्राणी मित्र पाहिले आहेत. त्याप्रमाणे असेच काहीसे पण थोडे वेगळे प्राणिमित्र आढळून आले आहेत.
अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील महाविहार बावरीनगर येथे भिक्खू संघपाल यांनी वानर, चिमण्या, कबूतर आदी पक्षी, प्राणी यांना जीव लावत आपलेसे केले आहे. अनेक वर्षापासून त्यांनी हा छंद जोपासला असून ते विहार परिसरात झाडावर खेळणारे प्राणी व पक्षी यांना अन्नदान देत त्यांची भूक भागवतात. पंचशीलामध्ये भगवान गौतम बुद्धांनी सांगितले पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी या ओळीप्रमाणे पशु प्राण्यावर दया करणे, मैत्री करणे व निष्पाप प्राण्यांचा जीव न घेणे, पशु पक्षांना दिलेले दान सात पटीने लाभ करणारे असते.
हेही वाचा - हिंगोली : उघडले औंढा नागनाथाचे द्वार- झाला हर, हर महादेवाचा गजर
सर्वांनी पक्षी प्राण्यावर प्रेम करावे
पुरातन काळापासून प्राणी पाळण्याची पुरावे आढळून येतात. भिंतीवर चित्र अनेक गोष्टींमधून माणूस प्राणी पळत होता याचे दाखले देतात. आता मात्र दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडला असताना प्राणी व पक्षांचे जीवन संकटात आले आहे. यासाठी अनेक पक्षी व प्राणीमित्र समोर येत आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मोबाईलमुळे सारे जग खिशात घेऊन माणूस फिरत आहे. त्यामुळे माणूस माणसाला ओळखायला तयार नाही अशा परिस्थितीमध्ये एक नवा आदर्श घालून दिला आहे. पक्षी- प्राण्यांची आपुलकीचे नाते जोपासणारे भिकू संघपाल यांनी महाविहार बावरीनगर येथील आहेत. विहार परिसरात मैदानात पक्ष्यांसाठी खाद्य टाकतात. अनेक लोक भेटीला आल्याने भिक्खूंना फळे खाद्य देतात ते खाद्य भिकू संघपाल हे पक्षी व प्राण्यांना देतात. भगवान गौतम बुद्धांनी दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी मैत्रीची शिकवण दिलेली आहे. त्याप्रमाणे करुना, मैत्री, माया, दान याप्रमाणे अनेक हिंसक प्राणी मैत्रीच्या बळाने शांत करता येतात. सर्वांनी पक्षी प्राण्यावर प्रेम करावे असे आवाहन भिकू संघपाल यांनी केले आहे.