esakal | नांदेड : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस रोप लागवड मार्गदर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यावेळी माहूर कृषि विभागाचे तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील टाकळी येथील तालुका कृषीनिष्ठ पुरस्कार शेतकरी लक्ष्मण तुकाराम घुले यांच्या रोप वाटिकेत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

नांदेड : शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ऊस रोप लागवड मार्गदर्शन

sakal_logo
By
जितेश जाधव

आष्टा (ता. माहूर, जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडावी व पाण्याची मोठी बचत होऊन चांगल्या पद्धतीचे उत्पन्न घेता यावे यासाठी शेतकऱ्यांनी पीक बदल करावी. यावेळी माहूर कृषि विभागाचे तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील टाकळी येथील तालुका कृषीनिष्ठ पुरस्कार शेतकरी लक्ष्मण तुकाराम घुले यांच्या रोप वाटिकेत मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी ऊस रोप लागवड मागदर्शन प्रसंगी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत चालला असून पावसाचा खंड, बियाण्यातील दोष, परतीच्या पावसाने दिलेला दगा यामुळे बळीराजाच्या पदरी केलेला खर्चही निघत नसल्याचे सांगून शेतपिक लागवड करताना पीक पद्धतीत बदल करणे गरजेचे बनले असल्याचे सांगितले. या वर्षी परतीच्या पावसाने दगा दिल्याने कापूस पिकावर गुलाबी बोंड अळीसह आदी रोगाचा रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नात मोठा फटका बसला. आता दिवसेंदिवस नवनवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून ठिबक सिंचनाचा वापर करून कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पीक लागवडी कडे वळावे असे मार्गदर्शन करताना आवाहन केले.

हेही वाचा -  मराठवाडा पदवीधर निवडणूकीचा बिगुल वाजला; एक डिसेंबरला होणार मतदान, जिल्ह्यात १६,२७६ मतदार -

यांची होती उपस्थिती 

यावेळी डेक्कन शुगर प्रा. ली. मंगरूळ साखर कारखानाचे मुख्य ऊस विकास अधिकारी भोंगाडे, कर्मचारी आर. के. सूर्यवंशी, सी. एन. चोले, पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल जोंधळे, प्रगतशील शेतकरी दिलीप मुनगीनवार, अमोल केशवे, आशीफ शेख, शिक्षक सोळंके, नामदेव पवार, मोहन बियाळे, बाबू फारुखी, किशोर अडकीने पाटील, उद्धव चोले, अंगद मुंडे, राजकुमार मानडवकर, बाळू ठाकरे, बालाजी मुंडे, संदीप पाटील, राम हरी जाधव, सुमेरसिंह जोनवाल, सजय सोनटके आदी शेतकरी बांधव उपस्थित होते. प्रस्ताविक लक्ष्मण घुले यांनी तर उपस्थितांचे आभार पांडुरंग घुले यांनी मानले.

संपादन- प्रल्हाद कांबळे