esakal | नांदेड - रविवारी ३५ कोरोना पॉझिटिव्ह, ५४ जण कोरोनामुक्त 
sakal

बोलून बातमी शोधा

file Photo

रविवारी एक हजार ५४७ अहवाल प्राप्त झाले. यातील एक हजार ४९३ निगेटिव्ह, ३५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार ३६० इतकी झाली आहे.

नांदेड - रविवारी ३५ कोरोना पॉझिटिव्ह, ५४ जण कोरोनामुक्त 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कधी कमी जास्त होत आहे. रविवारी (ता.२९) प्राप्त झालेल्या अहवालात ५४ रुग्ण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू तर ३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शनिवारी (ता.२८) तपासणीसाठी घेतलेल्या स्वॅबपैकी रविवारी एक हजार ५४७ अहवाल प्राप्त झाले. यातील एक हजार ४९३ निगेटिव्ह, ३५ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार ३६० इतकी झाली आहे. शनिवारी विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या दत्तनगर नांदेड येथील महिला (वय ५१) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मृत्यूची संख्या ५४९ वर पोहचली आहे. 

हेही वाचा - नांदेड ः वर्षपूर्ती झाली, वचनपूर्तीचे काय? : आमदार प्रवीण दरेकर ​

आतापर्यंत १९ हजार २३४ रुग्ण कोरोनामुक्त  

विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - पाच, जिल्हा रुग्णालयातील - १६, एनआरआय भवन - १४, नायगाव - दोन, हदगाव - दोन आणि खासगी रुग्णालयातील - १५ असे, ५४ रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १९ हजार २३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचले पाहिजे - नांदेड : जिल्ह्यात ऑनलाईन मटका जुगार जोमात, ‘सुपरकिंग कॅसीनोद्वारे अवघ्या दोन मिनिटात निकाल ​

२३६ खाटा रिकाम्या 

रविवारी नांदेड वाघाळा महापालिकेंतर्गत क्षेत्रात - १५, अर्धापूर - तीन, मुखेड - पाच, कंधार - दोन, मुदखेड - दोन, लोहा - तीन, किनवट - दोन, हिंगोली - एक, परभणी - एक आणि लातूर - एक असे ३५ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २० हजार ३६० वर पोहचली आहे. त्यापैकी १९ हजार २३४ रुग्ण कोरनामुक्त झाले आहेत. तर ५४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३८४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी १४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत ६२६ स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती. सोमवारपर्यंत अहवाल येणे अपेक्षित आहे. सध्यास्थितीत विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात - १७१, जिल्हा शासकीय रुग्णालयात - ६५ अशा २३६ खाटा रिकाम्या आहेत. 

कोरोना मीटर - 

आज पॉझिटिव्ह रुग्ण - ३५ 
आज कोरोनामुक्त - ५४ 
आज मृत्यू - एक 
एकुण पॉझिटिव्ह - २० हजार ३६० 
एकुण कोरोनामुक्त - १९ हजार २३४ 
एकुण मृत्यू - ५४९ 
उपचार सुरु - ३८४ 
गंभीर रुग्ण - १४ 
अहवाल तपासणी सुरु - ६२६ 
 

 
 

loading image