esakal | नांदेड : ग्रामपंचायत निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या- व्ही. व्ही. गोबाडे

बोलून बातमी शोधा

file photo

निवडणूक काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये त्यानिमित्ताने कंधार पोलिस ठाण्याच्या वतीने गावोगावी शांतता कमिटीच्या बैठकी घेऊन ग्रामपंचायत निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी असे आवाहन कंधार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही.व्ही. गोबाडे यांनी केले.

नांदेड : ग्रामपंचायत निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या- व्ही. व्ही. गोबाडे
sakal_logo
By
धोंडीबा बोरगावे

फुलवळ (जिल्हा नांदेड) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सर्वत्र चालू झाली असून उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. निवडणूक काळात कुठेही अनुचित प्रकार घडू नये त्यानिमित्ताने कंधार पोलिस ठाण्याच्या वतीने गावोगावी शांतता कमिटीच्या बैठकी घेऊन ग्रामपंचायत निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी असे आवाहन कंधार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्ही.व्ही. गोबाडे यांनी केले.

फुलवळ सर्कलमधील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक काळात गावागावात ग्रामस्थांनी व इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन प्रत्येकांनी समंजसपणा घेत आचार संहितेचे तंतोतंत पालन करावे. तसेच सध्या गेली अनेक महिन्यापासून सर्वत्र हाहाकार घातलेल्या कोरोना ( कोविड १९ ) चा विचार करता शोसल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर आदी बाबींचा वापर स्वतः करावा आणि इतरांनाही करायला सांगावे असे मत श्री गोबाडे यांनी शनिवारी (ता. २६) फुलवळ (ता. कंधार) येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ग्रामस्थ व उमेदवारांसमोर व्यक्त केले.

हेही वाचानांदेड : राष्ट्रीय महामार्गच्या कामात वीज वितरणचा आडवा दांडू. -

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आम्ही, आपणास कोणीही शासन नियमांचे उल्लंघन करु नये हे सांगतानाच आपण ग्रामस्थांनी पोलिस व प्रशासनाला मोलाचे सहकार्य करावे हे सांगण्यासाठी आलोय. तसेच ज्या- ज्या ठिकाणी आमचे आपणास सहकार्य लागेल तेंव्हा बिनधास्त कोणीही एक फोन करावा आम्ही धावून येऊ, पण जर का कोणी कायदा हाती घेण्याचा प्रयत्न केला आणि शासन नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना मात्र कायद्याच्या चौकटीत बसवून योग्य ती कार्यवाही पण करु असे ठणकावून सांगितले.

यावेळी बिट हवालदार मधुकर गोंटे, सुनील पञे, तुकाराम जुने, राठोड, शेख मगदूम, नारायण गोंड यांच्यासह गावातील पोलिस पाटील इरबा देवकांबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष धोंडीबा मंगनाळे, जेष्ठ नागरिक नारायणराव मंगनाळे, दिगंबर मंगनाळे, बसवेश्वर मंगनाळे, सदाशिव पटणे, आनंदा पवार, नवनाथ बनसोडे, धम्मानंद जाधव, तुकाराम फुलवळे, खाज्यामियाँ पठाण, नागेश सादलापुरे यांच्यासह गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन - प्रल्हाद कांबळे