

Nanded
esakal
नांदेड: वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख सोशल मीडियावर ठेवून गोदावरी नदीपात्रात कार घालून आत्महत्या करणारे शिक्षक सुनील नारायण मोरे यांनी आधी आपल्या दोन्ही मुलांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले. या निष्कर्षानंतर मोरे यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.