नागरिक उकाड्याने हैराण; नांदेडचा पारा ४१ अंशावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Temperature

नागरिक उकाड्याने हैराण; नांदेडचा पारा ४१ अंशावर

नांदेड : गेल्या आठवड्यापासून उष्णतेची लाट वाढल्याचा अनुभव नांदेडकर घेत आहेत. परिणामी मार्च संपण्यापूर्वीच नांदेडच्या तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचला आहे. पहाटेचे गार वारे आणि दिवसभरात वाढणारा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. तर एरव्ही शहरातील गजबजलेल्या प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.

वातावरणातील बदलामुळे गत हिवाळ्यात कधी उकाड्याचा तर कधी एकदम शरीर गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव घ्यावा लागला. हिवाळा काहीसा लांबल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात ऊन जाणवले नाही. परंतु, मार्च महिन्यात उन्हाने आपला रंग दाखविण्यास सुरुवात केली. वसंताची चाहूल लागताच उन्हाचा चटका वाढतो. वसंतामध्ये पानगळ सुरु होते. त्यामुळे फुलांनी बहरून आलेले वृक्ष डोळे सुखावतात. मात्र, मागील आठवड्याभरापासून मराठवाड्यात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने ऊन चांगलेच तापले आहे.

मार्च संपण्यापूर्वीच नांदेडच्या तापमानाचा पारा ४१ अंशावर पोहचला आहे. सकाळच्या वेळी गारवा जाणवत असून सकाळी ११ नंतर कडक ऊन तापण्यास सुरुवात होत आहे. दुपारी एक वाजेनंतर चार वाजेपर्यंत शहरातील वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. ऊन्हामुळे सध्या सर्वत्र रस्त्याच्या कडेला रसवंतीगृह, लस्सी, फळांच्या ज्युस सेंटरवर नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.

Web Title: Nanded Temperature Mercury At 41 Degrees City Streets Citizens

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedTemperature