नांदेड : कर्जबाजारी शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
Thursday, 17 December 2020

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दापशेड, तालुका लोहा येथील शेतकरी संजय किशनराव मोरे (वय ४८) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना ता. नऊ डिसेंबर रोजी दापशेड शिवार तालुका लोहा येथे घडली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की दापशेड, तालुका लोहा येथील शेतकरी संजय किशनराव मोरे (वय ४८) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. त्यामुळे ते कर्जबाजारी झाले होते. हाताला काम नाही व कर्जाचा वाढता बोजा यामुळे त्रस्त झाले. अखेर त्यांनी नऊ डिसेंबर रोजी आपल्या शेतात जाऊन विष प्राशन केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी चेतन संजय मोरे यांच्या माहितीवरुन सोनखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर करत आहे.

हेही वाचानांदेड : अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी हरिहरराव भोसीकर -

दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यातील चंद्रपूर येथील नितीन बापूराव सावते (वय २५) यांनी कुठल्यातरी कारणावरुन ता. सात डिसेंबर रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती पोलिस कर्मचारी बालाजी सोनाजी लक्षटवार, नेमणूक पोलिस ठाणे हिमायतनगर यांनी किनवट पोलिस ठाण्यात दिली. यावरुन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री पांढरे करत आहेत.

तर तिसऱ्या घटनेत उमरी तालुक्यातील भायेगाव येथील सुनील सुधाकर वाघमारे (वय २८) यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली. नऊ डिसेंबरच्या रात्री आठच्या सुमारास त्याने विष प्राशन केले. त्याला नांदेडच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाणे नांदेडचे पोलिस नाईक चांदणे यांच्या माहितीवरुन उमरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.  तपास पोलिस नाईक श्री. सरोदे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Three, including a debt-ridden farmer, committed suicide nanded news