esakal | नांदेड : तीन दुचाकी चोरांना अटक, दागिणे व दुचाकीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त- शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी या चोरट्यांवर लक्ष ठेवून अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सोन्याचे दागिणे, दुचाकी व किंमती मोबाईल असा सात लाख एक हजार ७४१ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.  या पथकाचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी कौतुक केले.

नांदेड : तीन दुचाकी चोरांना अटक, दागिणे व दुचाकीसह सात लाखाचा मुद्देमाल जप्त- शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरात वाढत्या जबरी चोऱ्या, चैन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीसह घरफोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या गुन्ह्यांवर प्रतिबंध घालून आरोपींच्या मुसक्या आवळण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सर्व ठाणेदारांना दिल्या. यावरुन शिवाजीनगर पोलिसांनी या चोरट्यांवर लक्ष ठेवून अखेर त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून सोन्याचे दागिणे, दुचाकी व किंमती मोबाईल असा सात लाख एक हजार ७४१ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत.  या पथकाचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी कौतुक केले.

लाॅकडाउन उठल्यानंतर दसरा, दिवाळी या सणासुदीच्या काळात शहरात शिवाजीनगर, विमानतळ व भाग्यनगर या भागात चैन स्नॅचिंग, जबरी चोरी, घरफोडी व जुचाकी चोरीचे गुन्हे वाढले होते. शहरातील सर्व डिटेक्शन ऑफिसर यांना सदर गुन्हे उघड करुन आरोपींना अटक करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या. गेल्या पंधरा दिवसापासून शिवाजीनगर पोलिस ठाणे अंतर्गत पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांनी आपल्या ठाण्याचे गुन्हे शोध पथकप्रमुख माणिक डोके यांना त्यांच्या सहकार्‍यांसह सूचना देऊन गुन्हेगारांना अटक करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील जमिनीचे आरोग्य बिघडले, आल्कधर्मी जमिनीच्या प्रमाण वाढले -

सीसीटीव्हीचा पोलिसांनी घेतला आधार

या पथकाने शहरातील ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यात चैन स्नॅचींग करणाऱ्या टोळीवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवले. यावरुन ता. 30 नोव्हेंबर रोजी अनिल सुरेश पवार उर्फ अनिल पंजाबी (वय २२) यास अटक केली. त्यानंतर ता. तीन डिसेंबर रोजी शेख अमीर शेख पाशा (वय २०) राहणार सिडको यास ताब्यात घेऊन त्यानंतर ता. चार डिसेंबर रोजी त्यांचा साथिदार सचिन शिंदे यास चैत्यनगर येथून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शहरात वेगवेगळे गुन्हे केल्याची कबुली दिली. एवढेच नाही तर त्यांच्याकडून पोलिसांनी ९०. ६३ ग्राम सोन्याचे दागिणे (ज्यात चार मंगळसूत्र, एक नेकलेस असा एकूण चार लाख ३७ हजार ७४१ रुपयांचा मुद्देमाल) तसेच एक लाख १२ हजार रुपये किमतीची दुचाकी (पल्सर) असा एकूण पाच लाख ६९ हजार ७४१ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

येथे क्लिक करा - नांदेड : भाग्यनगर पोलिसांनी आरोपीसह सायाळ येथील शेतातून जप्त केल्या बारा दुचाकी

अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

त्यानंतर ता. २७ नोव्हेंबर रोजी गोपाल उर्फ विजय किशनलाल बटावाले राहणार विष्णुनगर यास अटक करुन त्याच्याकडून स्प्लेंडर कंपनीची दुचाकी व दहा किंमती मोबाईल असा एक लाख एक हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांची पोलिस कोठडी संपताच त्यांना पुढील कारवाईसाठी ज्या ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत त्या ठाणेदारांच्या स्वाधीन केल्या जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.  

यांनी घेतले परिश्रम
 
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक डोके व त्यांचे सहकारी संजय मुंडे, दिलीप राठोड, रामकिशन मोरे, लियाकत शेख, दत्तात्रय कांबळे, काकासाहेब जगताप, राजकुमार डोंगरे आणि मधुकर आवातीरक यांनी परिश्रम घेतले.

loading image