Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

सात जिल्ह्यांतील ७६ संस्थांचे संशोधक सादर करणार नाविन्यपूर्ण प्रकल्प.
Hosting rights for 'Avishkar 2026' awarded at state-level workshop

Hosting rights for 'Avishkar 2026' awarded at state-level workshop

sakal

Updated on

नवीन नांदेड - विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्ती, नाविन्यपूर्ण कल्पना आणि वैज्ञानिक प्रतिभेला वाव देणाऱ्या बहुमान्य ‘आविष्कार २०२६’ या विभागीय संशोधन स्पर्धेचे यजमानपद नांदेड येथील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस (विष्णुपुरी) कडे सोपवण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (लोणेरे) जि. रायगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी ग्रामीण संस्थेकडे सोपविण्यात आल्याने संस्थेच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील कार्याला महत्त्वपूर्ण अधोरेखित करणारा हा बहुमान मानला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com