Nanded Tourism News : पुरातत्त्व विभागाचे धोरण पर्यटकांच्या मुळावर!

राज्य शासनाची उदासीनता; जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावे लक्ष
nanded tourism archaeological department policy affect kandhar tourism tourist marathi news
nanded tourism archaeological department policy affect kandhar tourism tourist marathi newsSakal

कंधार : पुरातत्व विभागाच्या उदासीन धोरणामुळे बऱ्यापैकी असलेल्या कंधार येथील भुईकोट किल्ल्याची वाट लागली आहे. पुरातत्व विभाग उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे काम करीत आहे. विभागाकडे किल्ल्याच्या देखरेखची जबाबदारी असताना हा विभाग कुंभकर्णी झोपेत आहे.

किल्ल्याची मोठ्याप्रमाणात दुरवस्था होऊनही संबंधीत अधिकाऱ्यांचा मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना ना किल्ल्याची चिंता आहे ना पर्यटकांची. संपूर्ण किल्ला आतून आणि बाहेरून काटेरी झुडपाने झाकून गेला आहे.

विभागाला याचे काहीच वाटेनासे झाले आहे. पुरातत्व विभागाचे धोरण पर्यटकांच्या मुळावर येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाचे कान टोचावेत, अशा भावना व्यक्त होत आहेत.

राज्यातील काही मोजक्याच सुस्थित असलेल्या किल्ल्यांच्या यादीत समावेश असलेल्या कंधार येथील भुईकोट किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. किल्ल्याला मोठ्याप्रमाणात काटेरी झुडपांचा विळखा पडून सुद्धा त्याकडे पुरातत्व विभाग लक्ष देत नाही. यामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होतो आहे.

पुरातत्व विभागाचे किल्ल्याकडे असेच दुर्लक्ष होत राहिले तर हा ऐतिहासिक किल्ला लवकरच शेवटची घटिका मोजेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.या किल्ल्याच्या सुशोभीकरणावर गेल्या १३-१४ वर्षात १५ कोटीच्या जवळपास रुपय खर्च करण्यात आले.

nanded tourism archaeological department policy affect kandhar tourism tourist marathi news
Nanded News : १४७ दिव्यांग नवमतदारांची नांदेडमध्ये नोंदणी

परंतू त्याचा किती उपयोग झाला, हा संशोधनाचा विषय आहे. आज या किल्ल्याची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी तडे गेले आहेत. विशेष म्हणजे २४ एकरात विस्तारलेल्या या किल्ल्याला पूर्णपणे काटेरी झुडपांचा विळखा पडला आहे. या झुडपांमुळे किल्ल्याच्या भग्नावस्थेत वाढ होत आहे.

सापांचा संचारही वाढला

कोरोनानंतर किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची ये-जा सुरू झाली आहे. हळूहळू पर्यटकात वाढ होत आहे. अशावेळी किल्ल्याच्या आतून व बाहेरून काटेरी वनस्पती, गवत, झाडे-झुडपे वाढल्याने पर्यटकांमध्ये नाराजी पसरत आहे.

nanded tourism archaeological department policy affect kandhar tourism tourist marathi news
Farmer News : कर्जमाफीच्या दोन्‍ही योजना ठरल्‍या कुचकामी; बॅंकेकडून कर्ज वसुलीचा तगादा कायम

झुडपांमुळे किल्ल्यात मोठ्या प्रमाणात सापांचा संचारही वाढला असून यामुळे एखादवेळी पर्यटकांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता आहे. येणारे पर्यटक जीव मुठीत धरून किल्ला पाहात आहेत. चांगल्या स्थितीत असलेला हा किल्ला पाहण्यासाठी राज्य व परराज्यातील विविध शहरातून पर्यटक कंधारला भेट देतात.

शालेय विद्यार्थ्यांच्या आशेवर विरजण

किल्ल्याला भेट देणाऱ्यामध्ये पर्यटकबरोबरच शालेय मुलांचा मोठ्याप्रमाणात समावेश असतो. मात्र, त्यांना सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. फार पूर्वी किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू समोर माहिती फलक लावण्यात आले होते.

आता त्या फलकावरची माहिती ऊन, पावसामुळे पुसून गेल्याने आपण कोणती वास्तू पाहतो याचा पर्यटकांना बोध होत नाही. किल्ल्यात वीज, पाण्याची व्यवस्था नाही. शौचालय नाही. यामुळे पर्यटकांसह शालेय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्या आशेवर विरजण पडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com