नांदेड : ट्रॅव्हल्स पार्किंगमुळे ट्रॅफिकला ब्रेक

वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त; वर्कशॉप, हिंगोली गेट, एलआयसीची चौकातील स्थिती
Nanded Travels parking traffic jams at LIC Chowk
Nanded Travels parking traffic jams at LIC Chowksakal

नांदेड : शहरातील वर्कशॉप, एलआयसी चौक, हिंगोली गेट तसेच रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या ट्रॅव्हल्स पार्किंगमुळे दररोज वाहतूकीची कोंडी होत आहे. ट्रॅव्हल्सवाले रस्त्यावरच ट्रॅव्हल्स उभी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. महत्त्वाचे म्हणजे या ट्रॅव्हल्स काही वेळ नाही तर अर्धा ते एक तास रस्त्यावरच उभ्या राहतात. एक गेल्यानंतर दुसरी येते. त्यामुळे येथून जाणारा वाहनधारक त्रस्त झाला असून वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.

रेल्वेस्थानक परिसर, हिंगोली गेट ते बाफना, एलआयसी चौक, वर्कशॉप येथे रस्त्यावर ट्रॅव्हल्स उभ्या रहात असल्याने ट्रॅफिक जाम होत आहे. प्रवासी भरले की नंतर दुसरी येते. साधारण दुपारी एक ते चार वाजेपर्यंत रस्ता खाली असल्याने फारशी अडचण येत नाही. मात्र, कार्यालयीन वेळेत सकाळी साडेनऊ ते अकरा आणि सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वरील भागात ट्रॅव्हल्समुळे वाहतुकीची चांगलीच कोंडी होत आहे.

रेल्वे स्थानक परिसरात मध्यवर्ती बसस्थानक आहे. त्यामुळे येथे महामंडळाच्या बसची दिवसभर रहदारी असते. त्यात खासगी बस आणि अॅटोरिक्षांची भर पडते. अशा परिस्थितीत रस्त्याच्या दुतर्फा ट्रॅव्हल्स, अॅटोरिक्षा उभ्या असल्याने एसटीला जाण्यासाठी जागाच उरत नाही. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. बस अडकली की त्याच्या मागे दुचाकी वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे नागरिकांचा विनाकारण वेळ जात असून महागडे पेट्रोलसुद्धा यामुळे खर्च होत आहे.

वाहनधारकांना करावी लागतेय कसरत

ट्रॅव्हल्स रस्त्यावर उभ्या रहात असल्याने वाहतुकीची कोंडी होते. याचे त्यांना काहीच देणे घेणे नाही. वाहतूक सुरळीत करण्याचा त्यांचा काहीच प्रयत्न नसतो. ट्रॅव्हल्स कचाट्यात सापडलेले दुचाकीधारक कसेबसे वाहन काढण्याचा प्रयत्न करतात. या नादात गाड्यांना डॅश लागणे आणि त्यातून भांडणे होण्याचाही प्रकार वारंवार घडत आहे.

पोलिसांच्या निशाण्यावर फक्त सामान्य

हेल्मेट घातले आहे की नाही, लायसन व इतर कागदपत्रे आहेत का, मुला-मुलींचे जाणारे जोडपे, दुचाकीवर जाणारे सामान्य दिसणारे पती-पती आदी सामान्य नागरिक पोलिसांच्या निशान्यावर आहेत. वर्कशॉप, रेल्वेस्थानक परिसरात वाहतूक पोलिस उभे असतात. मात्र, वाहतुक सुरळीत करण्याऐवजी सामान्य नागरिकांना अडवून लुट करत आहेत. आधीच महागाईने नागरिक होरपळत असताना वाहतूक पोलिस कारवाईच्या नावावर अतिरिक्त पैसे उकळत असल्याने वाहतूक पोलिसांच्या विरोधात नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com