नांदेड : अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

खासदार प्रताप पाटील चिखलीकर : इंदिरानगर येथे पार पडले वृक्षारोपण
Tree planting MP Pratap Patil Chikhlikar
Tree planting MP Pratap Patil Chikhlikarsakal

धर्माबाद : शहरातील इंदिरानगर येथील डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक संरक्षक भिंतीचे काम पूर्ण होत आले असून पुढील स्मारक वास्तूच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही व ५० लाख रुपयेपेक्षा कमी आर्थिक मदत करणे हे अन्यायकारक होईल, असे प्रतिपादन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

शहरातील डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक इंदिरानगर येथे खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी बालाजी बच्चेवार, श्रावण भिलवंडे, जनार्दन ठाकुर, झंवर, कृष्णा तिम्मापुरे, मोगलागौड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. याप्रसंगी इंदिरानगर येथील महिलांच्या वतीने खा. चिखलीकर यांना महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार चिखलीकर यांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे अण्णाभाऊ साठे मेमोरियल ट्रस्टचे कौतुक केले.

ट्रस्टचे अध्यक्ष माधवराव पिंगळे यांनी ट्रस्टच्या कार्यांचा व सद्द स्थितीतिल कामांची सर्व माहिती सांगून पुढील कार्यासाठी खासदार चिखलीकरांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे असे मत प्रास्ताविकेत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना शिंदे यांनी केले तर आभार नागोराव कमलाकर यांनी मांडले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश जटाळकर, कोषाध्यक्ष बि. ए. गोणारकर, सचिव प्रविण गायकवाड, बालाजी वाघमारे, गिरीश माजरमकर, प्रा. पिराजी गोणारकर, उमेश सूर्यवंशी, अविनाश पिंगळे, मनोज बोयाळ, माधव कमलाकर, जयानद गायकवाड, किरण वाखरडकर, आनंदा एडके, सत्यनारायन पवळे, भोजराम गोणारकर, लोकस्वराज्य आंदोलनाचे मराठवाडा अध्यक्ष व्यंकटेश डोईवाड, नारायण इबितवार, लक्ष्मण निदानकर, दत्ता कांचने, बालाजी डोईवाड, बाबुराव गोणारकर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com